इम्रान खान यांच्या 'नव्या पाकिस्ताना'त भ्रष्टाचार वाढला; पाहा भारत कोणत्या स्थानावर

By जयदीप दाभोळकर | Published: January 29, 2021 01:22 PM2021-01-29T13:22:51+5:302021-01-29T13:29:01+5:30

'हा' ठरला जगातील सर्वात प्रामाणिक देश

Corruption increased in pakistan prime minister Imran Khans New Pakistan See where India stands | इम्रान खान यांच्या 'नव्या पाकिस्ताना'त भ्रष्टाचार वाढला; पाहा भारत कोणत्या स्थानावर

इम्रान खान यांच्या 'नव्या पाकिस्ताना'त भ्रष्टाचार वाढला; पाहा भारत कोणत्या स्थानावर

Next
ठळक मुद्देन्यूझीलंड ठरला सर्वात प्रामाणिक देशभारताचीही रँकिंगमध्ये घसरण

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचे करप्शन इंडेक्सची नवी आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये इम्रान खान यांच्या नव्या पाकिस्तानातही भ्रष्टाचार वाढल्याचं दिसून आलं आहे. यामध्ये एकूण १८० देशांचं रॅकिंग जारी करण्यात आलं आहे. यात भारत ८६ व्या स्थानावर आहे. तर दुसरीकडे भारताचे शेजारी देश चीन ७८ व्या, पाकिस्तान १२४ व्या तर बांगलादेश १४६ व्या स्थानावर आहे. देशात भ्रष्टाचार संपवण्याचं आश्वासन देत सत्तेवर आलेल्या इम्रान खान यांच्या नव्या पाकिस्तानात भ्रष्टाचार वाढल्यानं पाकिस्तानातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे.
 
पाकिस्तानात भ्रष्ट्राचार वाढला असल्याची माहिती समोर आल्यानंतर आता पाकिस्तानातील विरोधी पक्षांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना घेरण्यास सुरूवात केली आहे. २०२० या वर्षात पाकिस्तान १२० व्या स्थानावर होता तर २०१९ मध्येही तेच स्थान होतं. परंतु आता पाकिस्तान १२४ व्या स्थावावर पोहोचला आहे. इतकंच नाही तर २०१८ शी तुलना केली तर इम्रान खान यांचा नवा पाकिस्तान ७ क्रमांक खाली घसरला आहे, असं विरोधकांनी म्हटलं. तर दुसरीकडे बिलावल भुट्टो यांच्या पीपीपीचे नेता शेरी रेहमान यांनी इम्रान खान यांच्यावर निशाणा साधत त्यांचे दावे खोटे असल्याचं म्हटलं. 

कर्जबाजारी पाकिस्तान जिन्नांची ओळख ठेवणार तारण; इम्रान खान घेणार ५०० अब्ज रूपयांचं कर्ज

हे आहेत सर्वात प्रमाणिक देश

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलच्या अहवालात सर्वात प्रामाणिक देशांच्या यादीत पाच देशांना स्थान देण्यात आलं आहे. यामध्ये डेन्मार्क, न्यूझीलंड, फिनलँड, सिंगापूर आणि स्वीडन या देशांचा समावेश करण्यात आला आहे. तर दुसरीकडे सर्वात भ्रष्ट देशांच्या यादीत व्हेनेझुएला, येमेन, सीरिया, सोमालिया आणि दक्षिण सूदान या देशांचा समावेश आहे. या यादीत अमेरिकाही ६७ व्या क्रमांकावर आहे. भारत या यादीत ८६ व्या क्रमांकावर घसरला आहे. २०१९ मध्ये भारत हा ८० व्या क्रमांकावर होता. ज्या देशात भ्रष्टाचार कमी होता त्या ठिकाणी कोरोना विषाणूचा सामना अधिक चांगल्या पद्धतीनं केला गेला असल्याचंही यात समोर आलं आहे. दुसरीकडे न्यूझीलंड आणि डेन्मार्कमध्ये सर्वात कमी भ्रष्टाचार असल्याची माहितीही या अहवालातून समोर आली आहे. 

Web Title: Corruption increased in pakistan prime minister Imran Khans New Pakistan See where India stands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.