Costa Titch : प्रसिद्ध रॅपरचे अवघ्या 27 व्या वर्षी निधन, गाणं गाताना स्टेजवर कोसळला अन्…
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 05:03 PM2023-03-12T17:03:02+5:302023-03-12T17:03:43+5:30
लाईव्ह कॉन्सर्टचा एक व्हिडिओही व्हायरल होतोय, ज्यात तो कोसळल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
Costa Titch Death Video : दक्षिण आफ्रिकेतील प्रसिद्ध रॅपर आणि संगीतकार कोस्टा टिच याचे निधन झाले आहे. 27 वर्षीय कोस्टा जोहान्सबर्गमधील अल्ट्रा साउथ आफ्रिका म्युजिक कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करत असतानाच स्टेजवरच कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. कोस्टा टिय याच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. या कॉन्सर्टचा एक व्हिडिओही व्हायरल होतोय, ज्यात कोस्टा कोसळल्याचे दिसत आहे.
RIP Costa Titch pic.twitter.com/zQN4pvl6hD
— 𝐍𝐰𝐚𝐧𝐲𝐞 (@nwanyebinladen) March 11, 2023
कोस्टा टिचच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कोस्टा टिच याच्या निधनाबद्दल विविध कलाकार आणि चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. कोस्टा टिचच्या निधनाच्या बातमीवर विश्वास ठेवणे चाहत्यांना कठीण जात आहे. कोस्टाचा परफॉर्म करतानाचा व्हिडीओ पाहून चाहतेही हळहळ व्यक्त करत आहेत. या व्हिडीओमध्ये परफॉर्म करत असताना कोस्टा धडपडतो अन् स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. मात्र, दुसऱ्यांदा तोल गेल्याने तो स्टेजवरच कोसळल्याचे व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.
कोण होता कोस्टा टिच?
कोस्टा टिच याला कोस्टा त्सोबानोग्लू म्हणून ओळखले जायचे. त्याचा जन्म 1995 मध्ये नेल्स्प्रूट येथे झाला. कोस्टा 'अॅक्टिव्हेट' आणि 'नकलकथा' सारख्या हिट चित्रपटांसाठी ओळखला जातो. त्याने नुकताच अमेरिकन गायक एकॉनसोबतचा रिमिक्स रिलीज केला होता. त्याच्या आकस्मिक निधनाने दक्षिण आफ्रिकेच्या संगीत उद्योगालाही धक्का बसला आहे.