पॅरीस हल्ल्यांसाठी ISIS ला मदत करणाऱ्या सलाह अबदेसलामला ब्रसेल्समध्ये अटक

By admin | Published: March 19, 2016 11:43 AM2016-03-19T11:43:29+5:302016-03-19T11:52:36+5:30

पॅरीसमध्ये 130 जणांचे प्राण घेणाऱ्या जिहादी हल्ल्यांसाठी सहाय्य करणारा इसिसचा दहशतवादी सलाह अबदेसलाम याला दहशतवादविरोधी पथकानं अटक केली आहे

Counseling aid to ISIS for paris attack Aidedemala arrested in Brussels | पॅरीस हल्ल्यांसाठी ISIS ला मदत करणाऱ्या सलाह अबदेसलामला ब्रसेल्समध्ये अटक

पॅरीस हल्ल्यांसाठी ISIS ला मदत करणाऱ्या सलाह अबदेसलामला ब्रसेल्समध्ये अटक

Next
>ऑनलाइन लोकमत
ब्रसेल्स, दि. 19 - पॅरीसमध्ये 130 जणांचे प्राण घेणाऱ्या जिहादी हल्ल्यांसाठी सहाय्य करणारा इसिसचा दहशतवादी सलाह अबदेसलाम याला दहशतवादविरोधी पथकानं अटक केली आहे. बेल्जियमच्या न्यायमंत्र्याने ही माहिती दिली. नोव्हेंबरमधल्या या हल्ल्यांनंतर सलाह हा फरार होता. मोलेनबीक या शहरातील एका फ्लॅटमध्ये घातलेल्या धाडीमध्ये सलाहबरोबर असलेली आणखी एक व्यक्ती जखमी झाली आहे. दहशतवादविरोधी पथकाने घातलेल्या या छाप्यात एकूण पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
 
 
कोण आहे सलाह अबदेसलाम
 
- उत्तर मोरोक्कोतल्या दांपत्याच्या पोटी ब्रसेल्समध्ये 1989 मध्ये सलाह जन्माला आला.
- त्याने वयाच्या 14 व्या वर्षी घराला आग लावली होती.
- पॅरीसवरील हल्ल्यापूर्वी सलाहची ओळख सिगारेट पित नाक्यावर उभा राहणारा आणि भावाच्या ब्राहिमच्या बारमध्ये पडलेला असणारा अशी होती.
- मोटरबाईक्स आणि फुटबॉलचं वेड असलेला सलाह असं काही करू शकेल यावर विश्वास बसत नसल्याचं मत शेजाऱ्यांनी व्यक्त केलं होतं.
- मी ओळखत असलेला सलाह हाच आहे हे पचत नसल्याचं मत एका मित्रानं व्यक्त केलं होतं.
- कुणाप्रतीही द्वेष मला कधी त्याच्या बोलण्यात जाणवला नसल्याचं मत एकानं व्यक्त केलं.
- सलाह हा समलिंगींच्या बारमध्ये पण जात होता अशी माहिती असून हल्ल्यांपूर्वी काही आठवडे आधीच तो अशाच एका बारमध्ये आढळला होता.
 
 
तो ISIS कडे कसा वळला?
 
-  सलाह समलिंगी होता आणि ISIS तर समलिंगी संबंधांना सैतानाचं काम मानते. त्यांनी समलिंगी व्यक्तिंना गच्चीतून खाली फेकून दिल्याचे व्हिडीयोही प्रसारीत झाले आहेत.
- अनैतिक लैंगिक संबंध, दारू व सिगारेट पिणाऱ्यांनाही चाबकाचे फटके मारण्याच्या शिक्षा ISIS देतं.
- त्यामुळं परस्पर भिन्न विचार व आचारसरणी कशी एकत्र आली हा प्रश्न आहे.
- विशेष म्हणजे, हे हल्ले घडवणाऱ्या ISIS च्या दहशतवाद्यांना दोन कार भाड्याने मिळवून देण्यात सलाहने महत्त्वाची भूमिका बजावली होती. 
- हल्ले घडवणाऱ्या टीमचा नेता अब्देल हमीद अब्बाउद याला पॅरीसमध्ये आणण्यासाठी सलाहने ऑस्ट्रीया व हंगेरीला चकरा मारल्या होत्या असंही निदर्शनास आलं आहे. 
- या पार्श्वभूमीवर दहशतवादी विचारसरणीच्या ISISकडे चंगळवादी सलाह कसा आकृष्ट झाला यावर त्याच्या अटकेमुळे प्रकाश पडेल अशी अपेक्षा आहे.

Web Title: Counseling aid to ISIS for paris attack Aidedemala arrested in Brussels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.