देश-परदेश- पोलिस-निदर्शकांत संघर्ष

By admin | Published: August 16, 2014 10:24 PM2014-08-16T22:24:54+5:302014-08-16T22:24:54+5:30

देश-परदेश- पोलीस-निदर्शकांत संघर्ष

Country-abroad - conflicts in police-protesters | देश-परदेश- पोलिस-निदर्शकांत संघर्ष

देश-परदेश- पोलिस-निदर्शकांत संघर्ष

Next
श-परदेश- पोलीस-निदर्शकांत संघर्ष

अश्वेतवर्णीय मुलाच्या मृत्यूप्रकरणी
निदर्शक पोलिसांविरुद्ध रस्त्यावर
न्यूयॉर्क: मायकल ब्राऊन या १८ वर्षी अश्वेतवर्णीय मुलाच्या हत्येच्या निषेधार्थ फर्ग्युसन शहरातील रस्त्यांवर उतरलेल्या अश्वेतवर्णीय निदर्शकांच्या हिंसक संतापाला पोलिसांना सामोरे जावे लागत आहे. मायकल ब्राऊन याला पोलिसांनी गोळ्या घालून ठार केल्याने या शहरात पोलिसांविरुद्ध संतापाची लाट उसळली असून, मायकलच्या कुटुंबियांनी शांततेचे आवाहन करूनही निदर्शक माघार न घेता पोलिसांविरुद्ध ररस्त्यावर उतरले आहेत. एवढेच नाही तर शनिवारी मध्यरात्रीनंतर शेकडो निदर्शकांनी ते दुकानात घुसखोरी करून लूटमार केल्याचे वृत्त आहे.
जमावाला पांगविण्यासाठी घटनास्थळी पोलिसांच्या दंगल काबू पथकाला पाचारण करण्यात आले आहे. काही निदर्शकांनी दगड आणि बाटल्या फेकून पोलिसांवर संताप व्यक्त केला. रविवारी मायकल ब्राऊनच्या कुटुंबियांनी शांतता रॅलीचे आयोजन केल्याचे नागरी हक्क संघटनेचे नेते अल शार्पटन यांनी सांगितले.
दरम्यान, फर्ग्युसन पोलीसप्रमुख थॉमस जॅकसन यांनी सांगितले की, ज्या अधिकार्‍याने ब्राऊनला गोळ्या घातल्या त्यांना ब्राऊनने जवळच्या दुकानातून चोरी केल्याची माहिती नव्हती. तो वाहतूक थांबवीत रस्त्याने जात होता, म्हणून या अधिकार्‍याने त्याला हटकले. पोलिसांनी जारी केलेल्या सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये एक अश्वेतवर्णीय व्यक्ती दुकानातील एका क्लर्कला धमक्या देत असल्याचे दिसते.
दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी मायकल ब्राऊनच्या मृत्यूप्रकरणी न्याय विभागामार्फत चौकशी करण्याचे आश्वासन दिले असून एफबीआयने या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.

Web Title: Country-abroad - conflicts in police-protesters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.