देश-परदेश : अमेरिका ओबामा

By Admin | Published: February 1, 2016 12:03 AM2016-02-01T00:03:59+5:302016-02-01T00:03:59+5:30

सहिष्णुतेसाठी ओबामा जाणार अमेरिकी मशिदीत

Country and abroad: US Obama | देश-परदेश : अमेरिका ओबामा

देश-परदेश : अमेरिका ओबामा

googlenewsNext
िष्णुतेसाठी ओबामा जाणार अमेरिकी मशिदीत
वॉशिंग्टन : अमेरिकेत मुस्लिमांविरुद्ध निर्माण होत असलेल्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर सहिष्णुतेसाठी आणि धार्मिक स्वातंत्र्याचा बचाव करण्यासाठी अध्यक्ष बराक ओबामा पुढील आठवड्यात मशिदीला भेट देणार आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून ओबामा यांनी मशिदीला भेट देण्याची पहिलीच वेळ असेल. शनिवारी व्हाईट हाऊसच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, ओबामा बुधवारी इस्लामिक सोसायटी ऑफ बाल्टिमोर मशिदीत जातील. तेथे ते समुदायाच्या नेत्यांशी राऊंडटेबल चर्चा करतील आणि त्यांच्यासमोर आपली भूमिका मांडतील.
आपल्या परदेश दौर्‍यात ओबामा यांनी आतापर्यंत वेगवेगळ्या मशिदींना भेट दिली आहे; पण अमेरिकेत त्यांनी मशिदीला भेट देण्याची ही पहिलीच वेळ असेल. त्यांच्या कार्यकाळातील अंतिम वर्षात ओबामा यांनी राजकीय नेत्यांना मुस्लिमविरोधी वक्तव्ये करू नयेत, असे आवाहन केले होते. विशेषत: रिपब्लिकन पार्टीचे डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली मुस्लिमविरोधी वक्तव्ये जगभर गाजली आहेत.

Web Title: Country and abroad: US Obama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.