देश-परदेश : दक्षिण चीन सागरात चीनचा लष्करी सराव
By Admin | Published: May 5, 2016 07:48 PM2016-05-05T19:48:12+5:302016-05-05T19:48:12+5:30
दक्षिण चीन सागरात
द ्षिण चीन सागरात चीनचा लष्करी सरावबीजिंग : चीनने शक्तीप्रदर्शन करीत वादग्रस्त दक्षिण चीन समुद्रासह पूर्व हिंद महासागर आणि पश्चिम प्रशांत सागरात लष्करी सराव सुरू केला असून, त्यातअत्याधुनिक युद्धनौका, हेलीकॉप्टर्स आणि विशेष युद्ध सैनिक सहभागी झाले आहेत. चीनी नौदलाच्या तीन युद्धनौका बुधवारी हैनान प्रांताच्या सान्या येथील बंदरातून रवाना होताच चीनच्या वार्षिक युद्धसरावास प्रारंभ झाला. या तीन युद्धनौकांत क्षेपणास्त्र विनाशक हेफेई, क्षेपणास्त्र फ्रिगेट सान्या आणि रसद पुरवठा करणारे जहाज होंगघु यांचा समावेश असून, क्षेपणास्त्र विनाशक लांझोउ आणि ग्वांगझोउ आणि क्षेपणास्त्र युद्धनौका युलिनही या सरावात सहभागी होतील. या युद्धनौका सध्या दुसर्या एका मोहिमेवर आहेत. चीन हेलीकॉप्टर आणि विशेष युद्ध सैनिकांना तीन गटात विभागण्यात आले असून, हे गट दक्षिण चीन सागर, पूर्व हिंद महासागर आणि पश्चिम प्रशांत भागात स्वतंत्रपणे युद्धसराव करीत आहेत. युद्धस्थितीतील तत्परता वाढविणे तसेच युद्धनौका, विमान आणि इतर सैन्यांत समन्वय राखण्याचे कौशल्य वाढविणे हा या लष्करी सरावाचा मुख्य उद्देश आहे. चीन जवळपास संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर दावा करतो. तथापि, त्याला व्हिएतनाम, फिलीपीन्स, मलेशिया आणि ब्रुनेई यासारख्या देशांचा आक्षेप आहे.