देश पुढे जावा, आधुनिक व्हावा या दिशेने करतोय काम - मोदी
By admin | Published: June 27, 2017 11:38 PM2017-06-27T23:38:16+5:302017-06-27T23:38:16+5:30
गेल्या तीन वर्षांत आमच्या सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून विविध विकासकामे केली आहेत. देश पुढे जावा, आधुनिक व्हावा या दिशेने आम्ही काम
Next
ऑनलाइन लोकमत
द हेग, दि. 27 - गेल्या तीन वर्षांत आमच्या सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून विविध विकासकामे केली आहेत. देश पुढे जावा, आधुनिक व्हावा या दिशेने आम्ही काम करत आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज द हेग येथे भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित करताना सांगितले. तसेच मनाने आपल्या देशाशी एकरूप राहा, आपल्या जीवनाला भारतीयमय बनवा, असे आवाहनही त्यांनी भारतीय वंशाच्या नागरिकांना केले. यावेळी सुमारे तीन हजार भारतीय उपस्थित होते. हेग येथे भारतीयांना संबोधित करताना मोदींनी जनधन योजना, मुद्रा योजना यांसह विविध योजनांचा आणि विकासकामांचा लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडला. तसेच महिला सक्षमीकरणासाठी सरकारकडून करण्यात येत असलेले कामाचा विशेष उल्लेख केला. तसेच अंतराळ संशोधनात देश करत असलेली प्रगती, शेती उत्पादनातील वाढ याचाही उल्लेख केला.
मोदींच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
- देश पुढे जावा, आधुनिक व्हावा या दिशेने आम्ही काम करत आहोत
- डच नागरिकांना पाच वर्षांसाठी टुरिस्ट आणि बिझनेस व्हिसा
- अंतराळ संशोधनात देशाने नाव मिळवले आहे
- कोळशापेक्षा सौरऊर्जा अधिक स्वस्त मिळत आहे, त्यामुळे देश स्वयंपूर्ण होईल
- सुरक्षा क्षेत्रात महिला महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत
-भारताच्या विकासात नारीशक्तीचा वाटा मोठा
- जनधन योजना, मुद्रा योजना यामुळे सर्वसामान्यांना फायदा
- सरकारकडे प्रत्येक समस्येवर उपाय असू शकत नाही, त्यासाठी लोकसहभाग आवश्यक
- भारतात सव्वाशे कोटी देशवासिय देश चालवतात
- भारतातील नव्या सरकारने लोकसहभागातून काम करण्यास प्राधान्य दिले आहे
- परदेशात सरकारचे दुतावास असतात, तिथे राजदूत असतात, पण परदेशात राहणारा भारतीय नागरिक हा राष्ट्रदूत
-नेदरलँडमध्ये युरोपमधील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक भारतीय राहतात
- पासपोर्टचा रंग बदलला म्हणून रक्ताचा रंग बदलत नाही
- देश सोडला तरी आपले भारतीयत्व सोबत आणणाऱ्या आपल्या पूर्वजांना नमन
The India of the 21st century cannot stay behind when it comes to technology and infrastructure. Everything we have must be world class: PM pic.twitter.com/JQoX7FNMpD
— ANI (@ANI_news) June 27, 2017
Dutch naagrikon ke liye aane wale dinon mein 5 saal ka business visa dene ki disha mein Bharat sarkar soch rhi hai: PM Modi in #Netherlandspic.twitter.com/pyrOXa7AMg
— ANI (@ANI_news) June 27, 2017