जगात सर्वाधिक सिगारेट फुंकणारे देश कोणते? भारत कितव्या क्रमांकावर?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2021 05:20 AM2021-06-04T05:20:49+5:302021-06-04T05:21:12+5:30

लॅन्सेटने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अभ्यासानुसार २०१९ च्या अखेरीस जगात धूम्रपान करणाऱ्याची संख्या तब्बल १ अब्जाचा आकडा ओलांडून गेलेली असावी.

country with most smokers in the world india china america pakistan rank | जगात सर्वाधिक सिगारेट फुंकणारे देश कोणते? भारत कितव्या क्रमांकावर?

जगात सर्वाधिक सिगारेट फुंकणारे देश कोणते? भारत कितव्या क्रमांकावर?

googlenewsNext

धूम्रपानाच्या विरोधातल्या मोहिमा जगभरात सर्वत्र चालू आहेत, धूम्रपानाचे तोटे ही एव्हाना शरीरशास्त्राने सिद्ध केलेले आहेत , तरीही जगातल्या सिगारेट फुंकणाऱ्या लोकांची संख्या काही कमी होताना दिसत नाही. लॅन्सेटने प्रसिद्ध केलेल्या ताज्या अभ्यासानुसार २०१९ च्या अखेरीस जगात धूम्रपान करणाऱ्याची संख्या तब्बल १ अब्जाचा आकडा ओलांडून गेलेली असावी. त्यातल्या दिलाशाची एका गोष्ट अशी की जगाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात धूम्रपान करणाऱ्यांची टक्केवारी घटली आहे. मात्र लोकसंख्या वाढीचा वेग मंदावलेला नसल्याने धूम्रपान करणाऱ्यांची संख्या मात्र वाढताना दिसते. - जगाचं हे धुराडं करण्यात आघाडीवर आहेत ते चिनी लोक. स्टॅटिस्टा कंट्री आउटलूक या संस्थेने  १२७ देशामधल्या धूम्रपानाच्या ताज्या ट्रेंडर्सचा अभ्यास प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार जगाच्या लोकसंख्येत २० टक्के वाटा असलेल्या चीनमध्ये धूम्रपान करणाऱ्यांचे प्रमाण मात्र जगाच्या एकूण प्रमाणात २८ टक्के आहे. या जगात विडी / सिगारेट ओढणाऱ्या प्रत्येक तिनातील एका व्यक्ती चिनी आहे. भारताची परिस्थिती जरा बरी आहे एवढेच. आपल्या देशात धूम्रपान करणाऱ्यांचा जागतिक वाटा चीनच्या निम्म्याहून कमी म्हणजे १० टक्के आहे.

कोण कुठे किती सिगारेट ओढते? 

या देशांचा जागतिक लोकसंख्येतील वाटा
चीन- २०%
भारत- २०%
अमेरिका- ५%
इंडोनेशिया- ४%
पाकिस्तान- ३%
बांगलादेश- २%

जागतिक धूम्रपान -कर्त्यांमधले त्या त्या देशाचे प्रमाण 
चीन- २८%
भारत- १०%
इंडोनेशिया- ८%
अमेरिका- ५%
पाकिस्तान- ३%
बांगलादेश- २%

Web Title: country with most smokers in the world india china america pakistan rank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.