पबच्या बाथरुममध्ये कपल झालं इंटिमेट, केलं खूप नुकसान; आकारला मोठा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2021 06:27 PM2021-12-17T18:27:33+5:302021-12-17T18:29:04+5:30
Couple Intimate in Pub Bathroom : पोलिसांनी आता त्या महिलेला अटक केली आहे. या कपलने तेथे बसवलेले सिंक देखील तोडले आणि पब मालकाचे बरेच नुकसान केले.
फ्लोरिडा: काही वेळा सार्वजनिक ठिकाणी लोकं सर्व मर्यादा ओलांडतात, त्यामुळे त्यांना नंतर त्याचे परिणाम भोगावे लागतात. असाच काहीसा प्रकार अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये घडला असून एका महिलेला पबच्या टॉयलेटमध्ये जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडण्यात आले.
तुटलेले बाथरूम सिंक
पोलिसांनी आता त्या महिलेला अटक केली आहे. या कपलने तेथे बसवलेले सिंक देखील तोडले आणि पब मालकाचे बरेच नुकसान केले. पोलिसांनी महिलेला अटक करून सुमारे ४० हजार रुपयांचा दंड ठोठावला.
'डेली स्टार'च्या वृत्तानुसार, अटकेसाठी दिलेल्या प्रतिज्ञापत्रात पबमध्ये असे कृत्य केल्यानंतर महिला आणि तिच्या मित्राला तत्काळ हाकलून देण्यात आल्याचे सांगण्यात आले. तसेच, महिलेने प्रथम बाथरुमचे सिंक अन्य काही कारणाने तुटले असावे, असा बनाव केला.
क्राइम :महिलेने काकी अन् भावाला जिवंत जाळले; या घटनेमागील कारण ऐकून बसेल धक्का
शीना बोरा या वर्षी श्रीनगरमध्ये एका सरकारी अधिकाऱ्याला दिसली होती; इंद्राणी मुखर्जीच्या वकिलाचा दावा
महिलेने आपला गुन्हा कबूल केला
मात्र, नंतर पोलिसांना दिलेल्या जबाबात महिलेने कबूल केले की, ती तिच्या मित्राचे बाथरूममध्ये शारीरिक संबंध ठेवत होती आणि यादरम्यान तेथील सिंक तुटला. मात्र, सिंक कसा तुटला याबाबत अधिक माहिती देण्यास महिलेने स्पष्ट नकार दिला.
असे कृत्य करताना ती महिला अंमली पदार्थांच्या आहारी गेली होती का, तिचे मानसिक आरोग्य बिघडले नाही ना, याचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र, घटनेच्या वेळी ती पूर्णपणे नशेत होती, असे पोलिसांच्या अहवालात म्हटले आहे. पब मालकाच्या तक्रारीवरून महिलेवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून, हा गुन्हा बलात्कारासारखाच आहे.
यापूर्वीही अशी घटना घडली होती
महिलेने तिच्या मित्राविषयी माहिती सांगण्यास नकार दिला आहे. ज्याने तिच्याशी बाथरूममध्ये संबंध ठेवले होते. फ्लोरिडातील लोक खूप रोमँटिक मानले जातात आणि तिथे अशा घटनांची तक्रार होणं सामान्य आहे. नुकतेच एका जोडप्याला पोलिस व्हॅनमध्ये कपडे काढून संबंध ठेवताना पकडण्यात आले.