डॉमिनोज पिझ्झा शॉपमध्ये सेक्स करणं दांपत्याला पडलं महागात, न्यायालयानं ठरवलं दोषी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 12:28 PM2017-09-22T12:28:53+5:302017-09-22T12:39:28+5:30
न्यायालयाने दांपत्याला सार्वजनिक ठिकाणी अयोग्य वर्तन केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. 17 ऑक्टोबर रोजी न्यायालय शिक्षा सुनावणार आहे.
लंडन - ब्रिटनमधील ब्रिडलिंग्टन येथे डॉमिनोज पिझ्झा शॉपमध्ये सेक्स करणं एका दांपत्याला चांगलंच महाग पडलं आहे. जेव्हा हे दांपत्य सेक्स करत होतं, तेव्हा आजूबाजूला कोणीच उपस्थित नव्हतं. मात्र त्यांचं हे कृत्य तेथील सीसीटीव्हीमध्ये कैद झालं. न्यायालयाने दांपत्याला सार्वजनिक ठिकाणी अयोग्य वर्तन केल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. 17 ऑक्टोबर रोजी न्यायालय शिक्षा सुनावणार आहे.
डॅनिएला हर्स्ट आणि क्रेग स्मिथ यांचा व्हिडीओ न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सादर करण्यात आला. जवळपास 30 मिनिटे चाललेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने 29 वर्षीय डॅनिएला हर्स्ट आणि 31 वर्षीय क्रेग स्मिथ यांना दोषी ठरवलं. सुनावणीदरम्यान न्यायालयात 18 मिनिटांचा हा व्हिडीओही पाहण्यात आला.
व्हिडीओमध्ये डॅनिएला हर्स्ट आणि क्रेग स्मिथ कॅसल रोडवरील डॉमिनोज शॉपमध्ये शिरताना दिसत आहेत. डॉमिनोजमध्ये गेल्यानंतर दोघांनी ऑर्डर दिली. यानंतर डॅनिएला हर्स्टने क्रेग स्मिथसोबत ओरल सेक्स करण्यास सुरुवात केली. यानंतर दोघांनी काऊंटरसमोर जाऊन सेक्स करण्यास सुरुवात केली. यावेळी शॉपमधील स्टाफ किचनमध्ये काम करत असल्याचं व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. स्टाफ किचनमध्ये व्यस्त असताना हे दोघे एकीकडे सेक्स करत होते.
न्यायालयात सुनावणीदरम्यान डॅनिएला हर्स्ट संपुर्ण वेल डोळ्यांवर हात ठेवून बसलेली पाहायला मिळाली, तर क्रेग स्मिथ एका दुस-या प्रकरणात जेलमध्ये होता. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर संपुर्ण प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयात मोठ्या स्क्रीन्सवर हा व्हिडीओ पाहण्यात आला. हे प्रकरण फेब्रुवारी महिन्यातील आहे. आरोपींच्या वकिलाचं म्हणणं आहे की, हा व्हिडीओ पिझ्झा स्टोअरच्या एका कर्मचा-याने बेकायदेशीरपणे इंटरनेटवर अपलोड केला, अन्यथा हजारो लोकांपर्यत तो पोहोचलाच नसता.
आरोपींच्या वकिलाने केलेल्या दाव्यानुसार, डॅनिएला हर्स्ट आणि क्रेग स्मिथ त्यावेळी दारुच्या नशेत होते. दोघांनी भलेही सार्वजनिक ठिकाणी सेक्स केला असला, तरी सर्वांसमोर केलेला नाही असा दावा वकिलाने केला आहे. मात्र न्यायालयाने दावा फेटाळत दांपत्याला दोषी ठरवलं. 17 ऑक्टोबर रोजी न्यायालय शिक्षा सुनावणार आहे.