धक्कादायक! दाम्पत्यानं धार्मिक स्थळावर बनवला शारीरिक संबंधांचा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 09:55 AM2020-02-15T09:55:44+5:302020-02-15T09:56:31+5:30

म्यानमारचं धार्मिक स्थळ असलेलं बागान जगभरात प्रसिद्ध आहे. हजारो भाविक इथे येत असतात.

couple made sex video at religious place and uploaded in myanmar | धक्कादायक! दाम्पत्यानं धार्मिक स्थळावर बनवला शारीरिक संबंधांचा व्हिडीओ

धक्कादायक! दाम्पत्यानं धार्मिक स्थळावर बनवला शारीरिक संबंधांचा व्हिडीओ

googlenewsNext

(प्रातिनिधिक फोटो)
नायपिटाः म्यानमारचं धार्मिक स्थळ असलेलं बागान जगभरात प्रसिद्ध आहे. हजारो भाविक इथे येत असतात. परंतु या धार्मिक स्थळावर एका जोडप्यानं शारीरिक संबंधांचा व्हिडीओ तयार केल्यानं खळबळ उडाली आहे. इतकंच नव्हे, तर तो व्हिडीओ त्या दाम्पत्यानं पॉर्न साइटवर अपलोड केला असून, त्यानंतर गोंधळ उडाला आहे. 

आयएनएसच्या रिपोर्टनुसार, इटलीच्या दाम्पत्यानं म्यानमारच्या पवित्र स्थळ असलेल्या बागानमध्ये 12 मिनिटांचा शारीरिक संबंध प्रस्थापित करतानाचा व्हिडीओ तयार केला आहे. त्यानंतर हा चर्चेत असलेला व्हिडीओ पॉर्न वेबसाइटवर अपलोड करण्यात आला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ धार्मिक स्थळावर चित्रीत करण्यात आल्याचं स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे या जोडप्यानं हे सगळं प्राचीन पॅगोड्यात रेकॉर्ड केलं आहे.  

व्हिडीओसंदर्भात जेव्हा स्थानिकांना समजलं, त्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. स्थानिकांनी व्हिडीओ पाहिला आणि याची तक्रार करण्याची मागणी केली. रिपोर्टनुसार, बागानमधल्या एका नागरिकानं सांगितलं की, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर आम्हाला फार दुःख झालं. धार्मिक इमारत आणि पॅगोड्यामध्ये संबंध प्रस्थापित करणं अनुचित आहे. त्यात आमचा धर्म, संस्कृती आणि इतिहासाचा अनमोल वारसा असलेल्या ठिकाणी हे सर्व करण्यात आलं आहे.  

स्थानिक न्यूज एजन्सीच्या माहितीनुसार, या धार्मिक स्थळावर स्थानिकांसह परदेशी नागरिकांना शॉर्ट्स किंवा तोकडे कपडे घालून फिरण्यास मनाई आहे. पॅगोडा, मंदिर आणि धार्मिक इमारतीत चुकीचे कपडे घालणं पूर्णतः प्रतिबंधित आहे. म्यानमारची धार्मिक इमारत आणि परिसरात उघड्यावर चुंबन घेण्यासही मज्जाव आहे. सोशल मीडियावरही लोक या प्रकरणात टीकात्मक प्रतिक्रिया देत आहे. नवव्या आणि 13व्या शताब्दी वर्षात जवळपास तीन हजार पगोडे आणि मंदिरं असलेल्या बागानला युनेस्कोद्वारे ऐतिहासिक वारसा यादीत स्थान मिळालेलं आहे. इथे दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. 
 

Web Title: couple made sex video at religious place and uploaded in myanmar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.