फ्लाईटमध्ये कपलचं सुरू होतं ‘असं’ काही कृत्य, एअरहोस्टेस आली अन् ब्लँकेट टाकून निघून गेली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 12:41 PM2021-05-25T12:41:01+5:302021-05-25T12:41:20+5:30
सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे कृत्य होत असल्याने अनेकांना विचित्र वाटलं. त्यानंतर काही जणांनी केबिन क्रू सदस्यांकडे त्या दोघांची तक्रार केली.
काही कपल्स रोमांस करण्यात इतके गुंग झालेले असताना की त्यांना कशाचेही भान राहत नाही. सार्वजनिक ठिकाणी किसिंग करणं, रोमांस करणं अनेकदा वादाचं कारण बनतं. पाकिस्तानच्या एका फ्लाईटमध्ये कपलच्या रोमांस आणि किसिंगने सध्या एका वादाला तोंड फोडलंय. ही घटना कराचीहून इस्लामाबादला जाणाऱ्या फ्लाईट पीए २०० मध्ये घडलेली आहे.
ट्रिब्यूनच्या रिपोर्टनुसार, काही प्रत्यक्षदर्शींनी दावा केलाय की, विमानात चौथ्या रांगेत बसलेल्या एका कपलने अचानक किसिंग सुरू केली. ते पाहून इतरांना धक्का बसला. सार्वजनिक ठिकाणी अशाप्रकारे कृत्य होत असल्याने अनेकांना विचित्र वाटलं. त्यानंतर काही जणांनी केबिन क्रू सदस्यांकडे त्या दोघांची तक्रार केली. तेव्हा एअरहोस्टेसने कपलला सार्वजिनक ठिकाणी संयम ठेवावा अशी सूचना केली.
एअरहोस्टेसने सूचना देऊनही त्या कपलने रोमांस थांबवला नाही. त्यांनी पुन्हा किसिंग सुरू केली. तेव्हा एअरहोस्टेसने एक ब्लँकेट आणून त्या दोघांवर टाकली. या दोन्ही कपलच्या करकुतींमुळे इतर प्रवाशांना त्यांचा त्रास होऊ नये म्हणून एअरहोस्टेसने ही शक्कल लढवली. ट्रिब्यूनच्या रिपोर्टनुसार जेव्हा या कपलच्या सहकारी प्रवाशांनी जे करत असलेल्या गोष्टींवर आक्षेप घेतला तेव्हा या दोघांनी तुम्ही कोण आहात? आम्ही काहीही करू असं अहंकराने बोलले.
लग्न करायची हौस महागात पडली, ३ बायका, ५ मुलं अन्... #Policehttps://t.co/aOi6oOkTXb
— Lokmat (@MiLOKMAT) May 25, 2021
या विमानात प्रवास करणारे वकील फारूक अल्वी यांनी या प्रकरणात केबिन क्रूने कारवाई न केल्याबद्दल आणि या प्रकाराची एअरलाईन स्टाफकडे तक्रार न केल्यामुळे सिविल एव्हिएशन प्राधिकरणाकडे तक्रार केली आहे. सध्या सिविल एव्हिएशन प्राधिकरणाकडून या गोष्टीचा तपास सुरू आहे. ३ वर्षापूर्वी असेच यंग कपल चर्चेत आलं होतं. इस्लामाबादच्या सिटी सेंटर येथे कारमध्ये बसून ते किसिंग करत होते. पोलिसांनी यांना अटक केली त्यानंतर या दोघांना ४ महिन्याची शिक्षा सुनावली होती.