"वारांगनाही 100 पट चांगली"; सीमा हैदरच्या गर्भात सचिनचं बाळ असल्याचं ऐकताच पाकिस्तानी पती भडकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 13:07 IST2024-12-24T13:05:43+5:302024-12-24T13:07:10+5:30
"सीमा तिच्या वैध मुलांचा तर सांभाळ व्यवस्थित करू शकली नाही आणि आता अवैध मुलांना जन्म देत आहे. एक दिवस ती नक्कीच कायद्याच्या कचाट्यात येईल, असे गुलाम हैदरने म्हटले आहे."

"वारांगनाही 100 पट चांगली"; सीमा हैदरच्या गर्भात सचिनचं बाळ असल्याचं ऐकताच पाकिस्तानी पती भडकला
चार मुलांसह पाकिस्तानातून पळून भारतात आपल्या प्रियकराकडे आलेली सीमा हैदर (Seema Haider) पुन्हा एकदा आई होणार आहे. ग्रेटर नोएडातील रबुपुरा गावात प्रियकर सचिन मीनाच्या घरात राहणाऱ्या सीमा हैदरने ती सात महिन्यांची गरोदर असल्याचे म्हटले आहे. या वृत्तानंतर, सीमाचा पाकिस्तानी पती गुलाम हैदर प्रचंड संतापला आहे. सीमा तिच्या वैध मुलांचा तर सांभाळ व्यवस्थित करू शकली नाही आणि आता अवैध मुलांना जन्म देत आहे. एक दिवस ती नक्कीच कायद्याच्या कचाट्यात येईल, असे गुलाम हैदरने म्हटले आहे.
गुलाम हैदरने सोमवारी सायंकाळी एका युट्यूब लाइव्हद्वारे सीमा हैदरसंदर्भात भाष्य केले. एक फॉलोअरने सीमाच्या प्रेग्नंसीसंदर्भात विचारले असता गुलाम म्हणाला, "जी महिला आपल्या वैध मुलांची कदर करू शकली नाही, तीने अवैध मुलांना जन्म देऊन अथवा न देऊन काहीही फरक पडत नाही. आधी जी मुलं होती त्यांचा सांभाळ तर करू शकली नाही. त्यांना कुठून कुठे रडवलं. आता 10 अवैध मुलांना जन्म देओ. कायद्याचे हात फार लांब असतात. तिला याची जाणीव करू नदिली जाईल. तिला क्षमा केली जाणार नाही."
गुलाम हैदर म्हणाला, "न्यायालयांमध्ये निश्चितपणे वेळ लागेल, पण सत्याचाच विजय होईल. अशा स्त्रीला काय म्हणावे, जी अनोळखी व्यक्तीशी शारीरिक संबंध ठेवते आणि हसते. जिला स्वतःच्या, मुलांच्या, नवऱ्याच्या आणि आईवडिलांच्या इज्जतीची पर्वा नाही, तिला काय फरक पडतो? एक वारांगनाही (वेश्या) तिच्यापेक्षा 100 पट चांगली. ही तर तिच्यापेक्षाही वाईट निघाली. ती हसते, लाज वाटत नाही, बुडून मर."
गुलाम पुढे म्हणाल, "ती (सीमा) कितीही हसली तरी तिचा शेवट वाईट होईल. आपण आपल्या आयुष्यातत तिची 'बरबादी' नक्की बघणार."