प्रवेशबंदी लागू करण्यास न्यायालयाचा नकारच
By admin | Published: February 11, 2017 01:06 AM2017-02-11T01:06:34+5:302017-02-11T01:06:34+5:30
सात मुस्लिम बहुल देशातील लोकांना प्रवेशबंदीचा निर्णय लागू करण्यास अमेरिकेतील अपीली न्यायालयाने नकार दिला आहे.
सॅनफ्रान्सिस्को : सात मुस्लिम बहुल देशातील लोकांना प्रवेशबंदीचा निर्णय लागू करण्यास अमेरिकेतील अपीली न्यायालयाने नकार दिला आहे. हा निर्णय ट्रम्प यांच्यासाठी मोठा दणका मानला जात आहे.
ट्रम्प प्रशासनाने सात मुस्लिमबहुल देशांच्या नागरिकांना देशात प्रवेशावर बंदी आणली होती. दरम्यान, या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे ट्रम्प यांनी जाहीर केले आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर जाहीर नाराजी व्यक्त करताना ट्रम्प यांनी म्हटले आहे की, देशाची सुरक्षा पणाला लागली आहे. आपण आता वरच्या न्यायालयात भेटूया. हा राजकीय निर्णय असून या प्रकरणात आमचाच विजय होणार आहे. न्यायाधीशांनी सर्वसंमतीने म्हटले आहे की, या निर्णयावर स्थगिती आदेश न दिल्यास काय नुकसान होऊ शकते, हे सरकार सांगू शकले नाही. त्यामुळे हा प्रस्ताव आम्ही फेटाळत आहोत.