Omicron Variant : HIVमधून जन्मला कोरोनाचा नवा व्हेरिएंट 'ओमायक्रॉन'?; तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 12:27 PM2021-12-22T12:27:11+5:302021-12-22T12:35:14+5:30

Omicron Origin May Have HIV Connection : दक्षिण आफ्रिकेचे संशोधक एचआयव्हीचा ओमायक्रॉन व्हेरिएंटशी संबंध असल्याचा दावा करत आहेत.  

covid 19 latest update in india omicron origin may have an hiv connection | Omicron Variant : HIVमधून जन्मला कोरोनाचा नवा व्हेरिएंट 'ओमायक्रॉन'?; तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Omicron Variant : HIVमधून जन्मला कोरोनाचा नवा व्हेरिएंट 'ओमायक्रॉन'?; तज्ज्ञांनी दिली महत्त्वाची माहिती

Next

जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. ओमायक्रॉनने सर्वच देशांची चिंता वाढवली आहे. याच दरम्यान संशोधनातून नवनवीन माहिती समोर येत आहे. एका महिला वारंवार कोरोना पॉझिटिव्ह येत होती. बीबीसी रिपोर्टनुसार, दोन-चार वेळा नव्हे तर सलग आठ महिने महिला कोरोना पॉझिटिव्ह येत राहिली. या महिलेच्या शरीरात कोरोना तब्बल 30 वेळा म्युटेट झाला. त्यानंतर या महिलेला कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झाली. ही महिला एचआयव्ही रुग्ण होती. असाच आणखी एक प्रकार दक्षिण आफ्रिकेत आढळून आला. त्यानंतर या प्रकरणांच्या तपासाच्या आधारे, दक्षिण आफ्रिकेचे संशोधक एचआयव्हीचा ओमायक्रॉन व्हेरिएंटशी संबंध असल्याचा दावा करत आहेत.  

बीबीसीने दिलेल्या रिपोर्टनुसार, ओमायक्रॉन आणि एचआयव्ही बद्दल संशोधकांनी सांगितलेली सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ओमायक्रॉन व्हेरिएंटचा जन्म एखाद्या एचआयव्ही रुग्णामध्ये झाला असावा, हे शक्य आहे. ओमायक्रॉनचा प्रथम शोध घेणारी टीम लीड करणारे प्रोफेसर तूलियो दी ओलिवेरिया यांनी जगातील इतर देशांमध्ये अशी अनेक प्रकरणे आढळून आली आहेत आणि त्यांची संख्या 10 ते 15 दरम्यान आहे. ही गोष्ट अशक्य वाटत असली तरी जगभरातील असे लोक ज्यांची प्रतिकारक शक्ती खूप कमी आहे, ते कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा जन्म होण्यात महत्वाचे स्त्रोत ठरले असतील असं म्हटलं आहे. 

करोनाचा सामना करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या सरकारने स्थापन केलेल्या सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष आणि एचआयव्ही तज्ञ सलीम करीम यांनी कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेले रुग्ण हे कोरोनाचा नवा व्हेरिएंट निर्माण करणारा सर्वात मोठा सोर्स असू शकतात. परंतु हे अद्याप सिद्ध झालेलं नाही, आम्ही चार वेगवेगळ्या खंडांतील पाच वेगवगळे व्हेरिएंट पाहिले आहेत. त्यामुळे जे लोक ओमायक्रॉनवरून आफ्रिकेवर टीका करत आहेत, ते चुकीचं आहे असं म्हटलं आहे. 

ज्याप्रमाणे यूकेच्या कॅन्सर रुग्णाला कोरोनाच्या अल्फा व्हेरिएंटचे मूळ मानले जात होते, त्याचप्रमाणे ओमायक्रॉनचा संबंध एचआयव्हीशी असल्याचं म्हटलं जात आहे. केप टाऊनच्या एका हॉस्पिटलमधील डॉ. मार्क मेंडलसन यांनी दक्षिण आफ्रिकेत मधुमेह, कर्करोग, ऑटो इम्यून डिसीज, क्षयरोग आणि लठ्ठपणा असलेल्या लोकांची संख्या मोठी आहे. या सर्व आजारांनी ग्रासलेल्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती खूपच कमकुवत होते असं म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेत सुमारे 80 लाख लोक एचआयव्हीने ग्रस्त आहेत. इतकेच नाही तर या लोकांपैकी 30 टक्के लोक असे आहेत, ज्यांना अँटीरेट्रोव्हायरल थेरपी मिळालेली नाही. या थेरपीमुळे एचआयव्ही रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: covid 19 latest update in india omicron origin may have an hiv connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.