‘कोविड-१९ हा महाभयंकर विषाणू मानवनिर्मितच’
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 07:37 AM2020-06-11T07:37:40+5:302020-06-11T07:38:14+5:30
या संशोधनासंदर्भात शास्त्रज्ञांनी लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की, प्राण्यातून माणसामध्ये विषाणूने प्रवेश केला तर त्या विषाणूच्या डीएनए, आरएनएमध्ये फरक पडतो
लंडन : कोरोनाची महाभयंकर साथ ज्याच्यामुळे उद्भवली तो कोविड-१९ विषाणू मानवनिर्मित आहे, असा ठाम निष्कर्ष नॉर्वे व ब्रिटनच्या विषाणूतज्ज्ञांनी यासंदर्भातील अभ्यासातून काढला आहे. निसर्गामध्ये याआधी कधीही आढळली नव्हती अशी वैशिष्ट्ये कोविड-१९ या विषाणूमध्ये सापडली आहेत, असेही त्यांंनी म्हटले आहे.
या संशोधनासंदर्भात शास्त्रज्ञांनी लिहिलेल्या लेखात म्हटले आहे की, प्राण्यातून माणसामध्ये विषाणूने प्रवेश केला तर त्या विषाणूच्या डीएनए, आरएनएमध्ये फरक पडतो; पण तसा काही बदल कोविड-१९ विषाणूमध्ये आढळून आलेला नाही. याचा अर्थ हा विषाणू प्राण्यातून माणसांमध्ये संक्रमित झालेला नाही, हे स्पष्ट होते. तसेच माणसाला संसर्ग व्हावा अशीच या विषाणूची रचना आहे.