अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड लस/चाचणीचे नियम काय आहेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 04:12 PM2022-01-15T16:12:23+5:302022-01-15T16:16:12+5:30
कोरोना संकट काळात अमेरिकेत जायचं असल्यास नियम काय?
प्रश्न- अमेरिकेत येऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी कोविड लस/चाचणीचे नियम काय आहेत?
उत्तर- विमानानं अमेरिकेत येणाऱ्या नॉन इमिग्रेंट सज्ञान व्यक्तींनी (किमान वयोमर्यादा १८ वर्षे) लसीकरण पूर्ण केलेलं असणं गरजेचं आहे. नॉन इमिग्रंट्समध्ये अमेरिकन नागरिक नसलेल्या, कायदेशीर कायमस्वरुपी नागरिक (एलपीआर) किंवा इमिग्रंट व्हिसावर अमेरिकेला प्रवास करणाऱ्यांचा समावेश होतो.
६ डिसेंबरपासून सर्व प्रवाशांना, मग त्यांच्या लसीकरणाचं किंवा नागरिकत्वाचं स्टेटस काहीही असो, त्यांना निगेटिव्ह कोविड अहवाल (अमेरिकेत दाखल होण्यापूर्वीच्या एका दिवसातला) किंवा कोविडमध्ये बरे झाल्याची कागदपत्रं दाखवणं गरजेचं आहे. २ वर्षांखालील वयाच्या मुलांना यातून वगळण्यात आलं आहे.
पूर्ण लसीकरणाचे निकष खालीलप्रमाणे आहेत-
- स्वीकारण्यात आलेल्या सिंगल डोस लसीचा डोस घेऊन २ आठवडे (१४ दिवस) उलटल्यावर.
- स्वीकारण्यात आलेल्या दोन डोस लसीचा दुसरा डोस घेऊन २ आठवडे (१४ दिवस) झाल्यावर.
- क्लिनिकल ट्रायल सुरू असलेल्या कोविड-१९ लसीचे (प्लासिबो नव्हे) सर्व डोस घेऊन २ आठवडे (१४ दिवस) पूर्ण झाल्यावर.
- फेज ३ क्लिनिकल ट्रायलमध्ये असलेल्या नोवावॅक्स (किंवा कोवोवॅक्स) कोविड-१९ लसीचे (प्लासिबो नव्हे) सर्व डोस घेऊन २ आठवडे (१४ दिवस) पूर्ण झाल्यावर.
- स्वीकारण्यात आलेल्या मिक्स अँड मॅच लसीचे दोन्ही डोस घेऊन २ आठवडे (१४ दिवस) पूर्ण झाल्यावर.
तुम्ही हे निकष पूर्ण करत नसाल, तर तुमचं लसीकरण पूर्ण झालंय असं समजलं जाणार नाही. अशा प्रवाशांना बोर्डिंगपासून रोखण्याचा पूर्ण अधिकार एअरलाईन्सना आहे.
अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी एफडीएनं मंजूर केलेल्या आणि जागतिक आरोग्य संघटनेनं आपत्कालीन वापराची परवानगी दिलेल्या लसी ग्राह्य धरल्या जातील. अमेरिकेत प्रवेश देताना कोविशील्ड आणि कोवॅक्सिन ग्राह्य धरण्यात येतील.
जर तुम्हाला फ्ल्यूसारखी लक्षणं असतील किंवा कोरोनाचा संसर्ग झाल्याची शंका तुम्हाला असेल, तर तुम्ही प्रवास १४ दिवसांनी पुढे ढकलावा.
हे नियम बदलू शकतात ही बाब लक्षात घ्या. प्रवासाबद्दलच्या नियमावलीविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया https://in.usembassy.gov/visas/ आणि https://www.cdc.gov/coronavirus/2019-ncov/travelers/noncitizens-US-air-travel.html या संकेतस्थळाला भेट द्या.
महत्त्वाची सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceacवर जाऊन तपासू शकता. फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा.