Omicron Variant : भयावह! 'या' देशात ओमायक्रॉनचा विस्फोट, रुग्णसंख्येत मोठी वाढ, रुग्णालये भरली खचाखच 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2022 01:03 PM2022-07-20T13:03:12+5:302022-07-20T13:09:43+5:30

Omicron Variant : गेल्या सात दिवसांत कोरोनाचे 300,000 हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. वास्तविक संख्या दुप्पट असू शकते, असे अधिकाऱ्यांचे मत आहे.

covid19 australians admitted hospitals record levels third omicron wave subvariants ba 4- nd ba 5 | Omicron Variant : भयावह! 'या' देशात ओमायक्रॉनचा विस्फोट, रुग्णसंख्येत मोठी वाढ, रुग्णालये भरली खचाखच 

Omicron Variant : भयावह! 'या' देशात ओमायक्रॉनचा विस्फोट, रुग्णसंख्येत मोठी वाढ, रुग्णालये भरली खचाखच 

Next

सिडनी - ऑस्ट्रेलियामध्ये ओमायक्रॉनचा कहर पाहायला मिळत आहे. कोविड-19 मुळे विक्रमी संख्येने लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले. यानंतर, अधिकार्‍यांनी कंपन्यांना घरून काम करण्याची परवानगी देण्याचे आवाहन केले आणि लोकांना घरामध्ये मास्क घालण्याची आणि बूस्टर डोस त्वरित घेण्याची शिफारस केली. अधिकृत आकडेवारीनुसार, 5,300 ऑस्ट्रेलियन सध्या कोरोनामुळे रुग्णालयात दाखल आहेत. जे जानेवारीमध्ये BA.1 च्या उद्रेकादरम्यान नोंदवलेल्या विक्रमी 5,390 पेक्षा थोडे कमी आहेत. साथीचा रोग सुरू झाल्यापासून क्वीन्सलँड, तस्मानिया आणि वेस्टर्न ऑस्ट्रेलिया या राज्यांमध्ये ही संख्या आधीच सर्वाधिक आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, ऑस्ट्रेलिया सध्या अत्यंत संसर्गजन्य असलेला कोरोनाच्या नवीन सब व्हेरिएंट BA.4 आणि BA.5 पासून पसरलेल्या ओमायक्रॉनच्या तिसर्‍या लाटेच्या पकडीत आहे. गेल्या सात दिवसांत कोरोनाचे 300,000 हून अधिक प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. वास्तविक संख्या दुप्पट असू शकते, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. केवळ मंगळवारीच कोरोनाचे 50,000 रुग्ण आढळले, जे गेल्या दोन महिन्यांतील सर्वाधिक होते.

ऑस्ट्रेलियाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी पॉल केली यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांना सांगितले की, आम्हाला कमीतकमी थोड्या काळासाठी वेगळ्या पद्धतीने गोष्टी करण्याची गरज आहे. हॉस्पिटलमध्ये पोहोचणाऱ्या लोकांची संख्या लवकरच विक्रमी उच्चांक गाठेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की, संसर्ग टाळण्यासाठी घरून काम करणे हा अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे.

बूस्टर डोस घेण्याकडे लोकांच्या दुर्लक्षामुळे आरोग्य संकट आणखी गडद होण्याचा इशाराही अधिकाऱ्यांनी दिला आहे. ऑस्ट्रेलियामध्ये आतापर्यंत 16 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 95% लोकांना लसीचे दोन डोस मिळाले आहेत. ऑस्ट्रेलियात आतापर्यंत 10,845 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ऑस्ट्रेलियामध्ये केवळ 71 टक्के लोकांना लसीचे तीन किंवा अधिक डोस मिळाले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

Web Title: covid19 australians admitted hospitals record levels third omicron wave subvariants ba 4- nd ba 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.