“अधिकाऱ्यांना भ्रष्टाचारापासून दूर ठेवण्यासाठी कठोर नियम तयार करा”: शी जिनपिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2023 05:44 AM2023-12-25T05:44:33+5:302023-12-25T05:46:03+5:30
जिनपिंग म्हणाले, पक्षाच्या सदस्यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवले पाहिजे, ज्यामुळे संपूर्ण पक्षासाठी स्व-शिस्त राखण्याचा आदर्श निर्माण होईल.
बीजिंग ( Marathi News ):चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना इमानदारी राखण्यासाठी, नातेवाइकांना भ्रष्टाचारापासून दूर ठेवण्यासाठी कठोर नियम तयार करण्यासह “परदेशी उदाहरणांचे” आंधळेपणाने अनुसरण करण्यापासून वाचण्याचा इशारा दिला आहे.
जिनपिंग म्हणाले, पक्षाच्या सदस्यांनी मार्क्सवादी राजकारण्यांच्या नियमांनुसार, स्वतःवर नियंत्रण ठेवले पाहिजे, ज्यामुळे संपूर्ण पक्षासाठी स्व-शिस्त राखण्याचा आदर्श निर्माण होईल. जेव्हा भ्रष्टाचाराच्या विरोधात प्रयत्नांचा विचार येतो तेव्हा नेत्यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी कठोर नियम बनवले पाहिजेत.
१० लाखांहून अधिक अधिकाऱ्यांना शिक्षा
२०१२ मध्ये पक्षाचे नेतृत्व स्वीकारल्यापासून शी जिनपिंग यांनी त्यांची भ्रष्टाचारविरोधी मोहीम सुरू ठेवली आहे. तेव्हापासून अनेक सर्वोच्च लष्करी जनरलांसह दहा लाखांहून अधिक अधिकाऱ्यांना शिक्षा झाली आहे. जिनपिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, प्रत्येक सदस्याने त्यांच्या कामावर चर्चा केली.