या क्रिकेटपटूने चार वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Published: January 24, 2017 11:11 AM2017-01-24T11:11:52+5:302017-01-24T12:49:08+5:30

निवृत्ती आणि वैवाहिक जिवनात आलेल्या अपयशातील नैराश्‍यामुळे आत्महत्येचा विचार केला होता असा खुलासा त्याने केला आहे. आपली आत्मकथा द राँग वन मध्ये त्याने हा खळबळजनक खुलासा केला आ

This cricketer has attempted suicide four times | या क्रिकेटपटूने चार वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न

या क्रिकेटपटूने चार वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न

Next

ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. 24 - ऑस्ट्रेलियाच्या 2003 व 2007 विश्वचषक विजेत्या संघाचा हिस्सा राहिलेला फिरकीपटू ब्रॅड हॉगने चार वेळा आत्महत्या करण्यचा प्रयत्न केला होता. निवृत्ती आणि विवाहात आलेल्या अपयशातील नैराश्‍यामुळे आत्महत्येचा विचार केला होता असा खुलासा त्याने केला आहे. आपली आत्मकथा द राँग वन मध्ये त्याने हा खळबळजनक खुलासा केला आहे. 

2007-8 मध्ये क्रिकेटच्या सर्व प्रकारामधून निवृत्ती घेण्यावाचून माझ्याकडे अन्य कोणताही पर्याय नव्हता. कारण आंद्रियासोबत घटस्फोट घेतल्यानंतर पुढचे तीन वर्ष माझे खूपच तनावपूर्ण गेले. याकाळातच मला दारुचे व्यसन जडले. अनेक वेळा दु:खातिरेकाने हॉटेल सोडून जंगलातील झाडाझूडपांमध्ये जाऊन मी झोपत असे असा खुलासा हॉगने आपल्या आत्मकथेत केला आहे.


हॉगने द राँग वनमध्ये म्हटले आहे की, आत्महत्या करण्याच्या उद्देश्याने समुद्राकडे गेलो. समुद्र किनारी गाडी पार्क केली व चालत-चालत समुद्रकिनाऱ्यावर गेलो. त्यावेळी विचार केला की, यामध्ये उडी मारून जीव देऊ, वाचलो तर ठीक नाहीतर दुदैव. आयुष्याची दोरी नशीबावर सोडण्यास तयार होतो. असा विचार एक नाही चार वेळा केला परंतू आत्महत्या करण्याचे धाडस झाले नाही.

दरम्यान, ब्रॅड हॉग हा ऑस्ट्रेलियाच्या 2003 व 3007 च्या विश्‍व चषकाच्या संघातील प्रमुख खेळाडू होता. आयपीलएलमध्ये त्याने कोलकाकाताच्या संघाचे प्रतिनीधित्व केले आहे. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये तो वयाच्या 44 व्या वर्षी कोलकाताकडून खेळला होता. यामुळे आयपीएलमध्ये खेळणारा सर्वांत वयस्कर क्रिकेटपटू ठरला होता. तो सध्या बिग बॅशमध्ये मेलबर्न रेनेगेड्‌सकडून खेळत आहे.

Web Title: This cricketer has attempted suicide four times

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.