महात्मा गांधीजींच्या पणतीवर द.आफ्रिकेत फसवणुकीचा गुन्हा

By Admin | Published: October 20, 2015 02:30 PM2015-10-20T14:30:24+5:302015-10-20T14:30:24+5:30

महात्मा गांधी यांची पणती आशिष लता रामगोबिन यांच्यावर दक्षिण आफ्रिकेत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

The crime of betrayal of Mahatma Gandhi | महात्मा गांधीजींच्या पणतीवर द.आफ्रिकेत फसवणुकीचा गुन्हा

महात्मा गांधीजींच्या पणतीवर द.आफ्रिकेत फसवणुकीचा गुन्हा

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

जोहान्सबर्ग, दि. २० -  महात्मा गांधी यांची पणती आशिष लता रामगोबिन यांच्यावर दक्षिण आफ्रिकेत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. रामगोबिन यांनी दोघा व्यावसायिकांना ८ लाख ३० हजार डॉलर्सनी गंडवल्याचा आरोप आहे. 

दक्षिण आफ्रिकेतील व्यावसायिका एस आर महाराज आणि अन्य एका व्यावसायिकाला रामगोबिन यांनी नेटकेअर ग्रुपच्या हॉस्पिटलसाठी भारतातून वस्तू आयात करण्याचे कंत्राट मिळवल्याचे सांगितले. यासाठी भारतातून तीन कंटेनर मागवणार त्यांनी दोघांना सांगितले होते.  यासंदर्भातील बनावट कागदपत्रही त्यांनी दोघांना दिली होती. या कंटेनरच्या क्लिअरन्स आणि कस्टम ड्यूटीची प्रक्रिया पूर्ण करुन दिल्यास भरघोस नफा मिळेल असेही आशिष लता यांनी सांगितले होते. मात्र ही फसवणूक लक्षात येताच दोघा व्यावसायिकांनी स्थानिक पोलिसांकडे तक्रार दाखल केली. आशिष लता यांच्याविरोधात फसवणूक, चोरी अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

 

Web Title: The crime of betrayal of Mahatma Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.