ब्यूटी पार्लरमध्ये जाण्यासाठी बॉयफ्रेंडने दिले नाही पैसे; संतापलेल्या गर्लफ्रेंडने दिली 'ही' भयंकर शिक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 02:35 PM2022-02-03T14:35:05+5:302022-02-03T14:39:43+5:30
ब्यूटी पार्लरमध्ये जाण्यासाठी बॉयफ्रेंडने पैसे दिले नाही म्हणून संतापलेल्या गर्लफ्रेंडने टोकाचं पाऊल उचललं आहे.
महिला सुंदर दिसण्यासाठी निरनिराळ्या ब्यूटी ट्रीटमेंट घेतात. मात्र एखाद्या तरुणीने आपल्या पार्टनरला फक्त यासाठी टॉर्चर केलं असं जर कोणी सांगितलं तर सुरुवातीला विश्वासच बसणार नाही. पण हो हे खरं आहे. ब्यूटी पार्लरमध्ये जाण्यासाठी बॉयफ्रेंडने पैसे दिले नाही म्हणून संतापलेल्या गर्लफ्रेंडने टोकाचं पाऊल उचललं आहे. त्याचं अपहरण करून भयंकर शिक्षा दिली आहे. पार्लरमधील महागड्या ट्रीटमेंटसाठी पैसे देत नाही म्हणून महिलेने केलेलं कृत्य समजताच तुम्हालाही मोठा धक्का बसेल.
सराह डेवीज नावाच्या 33 वर्षीय महिलेने आपल्या बॉयफ्रेंडला 12 तास किडनॅप करून ठेवलं आणि त्याला अजब पद्धतीने टॉर्चर केलं. सॅलफोर्डची रहिवासी असलेल्या सराह हिची इच्छा होती की तिच्या बॉयफ्रेंडने तिच्या लिप बोटॉक्ससाठी पैसे द्यावे. जेव्हा बॉयफ्रेंडने असं केलं नाही, तेव्हा भडकलेल्या महिलेनं असं काही केलं ज्याची कल्पनाही कोणी केली नव्हती. 3 मुलांची आई असलेल्या सराहचं मार्क केनेडी नावाच्या व्यक्तीसोबत अफेअर होतं. सुरक्षारक्षकाची नोकरी करणाऱ्या सराहने लिप बोटॉक्स ट्रीटमेंट घेतली.
पैसे न दिल्याने सराहने बनवला एक भयंकर प्लॅन
महिलेला आपल्या बॉयफ्रेंडकडून पैसे हवे होते. मात्र केनेडीने पैसे न दिल्याने सराहने एक भयंकर प्लॅन बनवला. महिलेने केनेडीवर आपल्या दोन वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप केला, यानंतर तिने त्याला किडनॅप करून गुन्हा कबूल करायला लावण्याचा प्रयत्न केला. यासाठी तिने केनेडीला 12 तास किडनॅप करून ठेवलं. टॉर्चर करण्यासाठी त्याच्या डोक्यावर गरम पाणी ओतलं आणि हातावरही सिगारेटचे चटके दिले. महिलेसोबत तिचा एक मित्रही होता.
आरोपींनी त्या व्यक्तीच्या आईकडे दहा लाखांची मागणीही केली. त्यांच्या तावडीतून सुटल्यानंतर पीडित व्यक्तीने सांगितलं की महिलेनं आपल्या मित्रासोबत मिळून त्याचं अपहरण केलं आणि नंतर त्याला टॉर्चर केलं. हे प्रकरण कोर्टात पोहोचल्यानंतर न्यायालयाने केनेडीवरील आरोप खोटे असल्याचं सांगत त्याचं अपहरण करणाऱ्या स्टीवेनला 9 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. पीडित केनेडी आणि सराह यांची भेट गेल्या वर्षी फेसबुकवर झाली होती, तेव्हापासून ते सोबत होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.