गुन्हेगार शोधणारा रोबाकॉप चीनमध्ये
By admin | Published: February 25, 2017 11:32 PM2017-02-25T23:32:17+5:302017-02-25T23:32:17+5:30
गुन्हेगार पोलिस शोधतात तसेच त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी त्यांना कुणाची तरी मदत व गुप्त माहितीही हवी असते. परंतु आता थेट गुन्हेगार शोधणारा यंत्रमानव अर्थात रोबोकॉप आला आहे.
बीजिंग : गुन्हेगार पोलिस शोधतात तसेच त्यांच्यापर्यंत जाण्यासाठी त्यांना कुणाची तरी मदत व गुप्त माहितीही हवी असते. परंतु आता थेट गुन्हेगार शोधणारा यंत्रमानव अर्थात रोबोकॉप आला आहे. हा रोबो पोलिस गुन्हेगारांना शोधून काढेल, आग कुठे लागली आहे ते शोधेल आणि तुम्हाला शौचालयात जायचे असेल तर ते कुठे आहे ते तो दाखवेल. विशेष म्हणजे हा यंत्रमानव कधी थकणार नाही की त्याला विश्रांतीची गरज भासेल. जेथे गरज असेल तेथे तो न थकता गस्तही घालेल. या यंत्रमानवाचे नाव अॅन्बोट्स असून ते सध्या चीनच्या रस्त्यांवर सेवेत दिसतातही.
‘सायन्स टाईम्स’ दिलेल्या माहितीनुसार अॅन्बोट्समधील सॉफ्टवेअरच्या मदतीने पोलिस संशयित गुन्हेगारांना शोधू शकतात. तुम्ही जर रस्ता चुकला असाल व तुम्हाला निश्चित, असे ठिकाण हवे असेल तर ते तो दाखवू शकतो. तापमान व त्याचा दर्जा काय यावरही तो लक्ष ठेवू शकतो. अॅन्बोट्सची उंची १.६ मीटर्स असून तो आवाजाचा आणि कॅमेऱ्यांच्या आदेशानुसार स्वत:च हालचाल करतो. हे यंत्रमानव लोकांना कशी सेवा देतात याची चाचणी घेण्यासाठी हेनान प्रांतातील झेंगझोऊ पूर्व रेल्वे स्टेशनवर त्यांना नियुक्त करण्यात आहे. हे यंत्रमानवान धोकादायक परिस्थिती ओळखू शकतात का व दंगल आवरण्यासाठी त्यांचा उपयोग होऊ शकतो का या अंगाने विकसित केले जातील.