उरुग्वेच्या राष्ट्रपतींकडून फिफा अधिका:यांवर टीका

By admin | Published: July 1, 2014 12:52 AM2014-07-01T00:52:51+5:302014-07-01T00:52:51+5:30

बंदीनंतर उरुग्वेचे राष्ट्रपती जोस मुजिका यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) अधिका:यांवर टीका केली आह़े

The criticism of FIFA official from the President of Uruguay | उरुग्वेच्या राष्ट्रपतींकडून फिफा अधिका:यांवर टीका

उरुग्वेच्या राष्ट्रपतींकडून फिफा अधिका:यांवर टीका

Next
>मोंटेविडिओ : फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेदरम्यान इटलीविरुद्धच्या सामन्यांतील ‘बायटिंग’ प्रकरणामुळे स्टार स्ट्रायकर सुआरेझ लुईसवर घालण्यात आलेल्या बंदीनंतर उरुग्वेचे राष्ट्रपती जोस मुजिका यांनी आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) अधिका:यांवर टीका केली आह़े
एका टीव्ही शोदरम्यान राष्ट्रपती म्हणाले, ‘‘इटलीचा डिफेंडर जॉजिर्ओ चिलिनीचा चावा घेतल्यानंतर सुआरेझवर घालण्यात आलेली 4 महिन्यांची बंदी निराशाजनक आह़े सुआरेझने केलेल्या चुकीची शिक्षा त्याला व्हायलाच हवी होती़; मात्र फिफाने अधिक शिक्षा सुनावली़ याचे मी कदापि समर्थन करणार नाही़ राष्ट्रपती जोस मुजिका यांची पत्नी सिनेटर लुसिया टोपोलान्स्की यांनीही सुआरेझवरील कारवाईबाबत निराशा व्यक्त केली आह़े राष्ट्रपती मुजिका यांनी केलेल्या टीकेला आपले समर्थन असल्याचे त्यांनी वृत्तसंस्थेला सांगितल़े (वृत्तसंस्था)

Web Title: The criticism of FIFA official from the President of Uruguay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.