भारतीयांच्या थट्टेबद्दल ट्रम्प यांच्यावर टीका

By admin | Published: April 26, 2016 05:32 AM2016-04-26T05:32:18+5:302016-04-26T05:32:18+5:30

भारतीय कॉल सेंटर कर्मचाऱ्यांची थट्टा केल्याबद्दल हिलरी क्लिंटन यांच्या प्रचार पथकाने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे.

Criticizing Trump about Indians' joke | भारतीयांच्या थट्टेबद्दल ट्रम्प यांच्यावर टीका

भारतीयांच्या थट्टेबद्दल ट्रम्प यांच्यावर टीका

Next

वॉशिंग्टन : भारतीय कॉल सेंटर कर्मचाऱ्यांची थट्टा केल्याबद्दल हिलरी क्लिंटन यांच्या प्रचार पथकाने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. ट्रम्प यांनी भारतीय कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांच्या इंग्रजी उच्चारण शैलीची नक्कल केली होती. त्यावरून हिलरींच्या प्रचार पथकाने ट्रम्प यांची ही कृती भारतीय समुदायाचा अवमान करणारी आणि देशात फूट पाडणारी असल्याची घणाघाती टीका केली.
हिलरी यांच्या निवडणूक प्रचार मोहीम गटाचे अध्यक्ष जॉन पोडेस्टा म्हणाले की, ट्रम्प विविध समुदायांचा अवमान करत आले आहेत. भारतीय कर्मचाऱ्यांची त्यांनी केलेली थट्टा त्याचीच एक कडी आहे. (वृत्तसंस्था)

मेरीलॅण्डच्या जर्मन टाऊनमध्ये ‘इंडियन अमेरिकन्स फॉर हिलरी’च्या औपचारिक प्रारंभानंतर ते बोलत होते. ट्रम्प यांनी कट्टरतावाद आणि फुटीरवादाची मोहीम सुरू केली आहे. देशाला मित्र तसेच साथीदारांची आवश्यकता असताना अशी मोहीम चालवणे धोकादायक आहे, असे मला वाटते. अशी मोहीम जगभरात एकदुसऱ्याबाबत द्वेष व घरगुती पातळीवर फुटीच्या धोक्याला आमंत्रण देते, असे ते म्हणाले. हिलरींना पाठिंबा देण्यासाठी भारतीय अमेरिकी समुदायाने ‘इंडियन अमेरिकन्स फॉर हिलरी’ ही मोहीम सुरू केली आहे.

Web Title: Criticizing Trump about Indians' joke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.