वेदनादायक ! ऑस्ट्रेलियातील महाभयानक आगीत 480,000,000 वन्यजीवांचा जळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2020 09:01 AM2020-01-05T09:01:30+5:302020-01-06T10:10:18+5:30
दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या जंगलातील फ्लिंडर्स चेस नॅशनल पार्क, कांगारू बेट भागात 14 हजार हेक्टर क्षेत्र नष्ट झाले आ
मेलबर्न - ऑस्ट्रेलियात जंगलात लागलेल्या आगीने आतापर्यंत 23 जणांचा बळी घेतला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी शनिवारी 3 हजार रिजर्व्ह सैनिकांना बोलावून घेतले आहे. पंतप्रधान मॉरिसन यांनी सांगितले की, आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाला आहे. कांगारूबेटावरील महामार्गावरील आगीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, या आगीत जवळपास 50 कोटी प्राणी अन् पक्षांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामध्ये हजारो कोआला प्राण्यांचा समावेश आहे.
हफिंग्टन पोस्टच्या वृत्तानुसार, युनिव्हर्सिटी ऑफ सिडनीच्या इकोलॉजिस्ट यांच्या संशोधनानुसार या आगीत 480 मिलियन्स म्हणजेच जवळपास 48 कोटी प्राणी अन् पक्षांचा जीव गेला आहे. दक्षिण गोलार्धातील सूर्याच्या प्रवेशाने ऑस्ट्रेलियातील जंगलात आगीच हंगाम सुरू झाला असून यामध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीवांचा जीव गेलाय.
#AustraliaBurning
— Geeta Mohan گیتا موہن गीता मोहन (@Geeta_Mohan) January 3, 2020
I can't unsee this. Nor should anyone else!
The world has to #WakeUp to this real crisis.#bushfires#bushfiresAustraliapic.twitter.com/tluvpHRMom
दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या जंगलातील फ्लिंडर्स चेस नॅशनल पार्क, कांगारू बेट भागात 14 हजार हेक्टर क्षेत्र नष्ट झाले आहे, असे सांगण्यात येत आहे की, या भागात राहत असलेल्या 1 लाख लोकांपैकी 70 टक्के लोक येथून निघून गेले आहेत. माऊंट होथममध्ये 67 कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. वाऱ्याचा हा वेग 80 कि.मी. प्रतितास होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. गिप्सलँडमध्ये तापमान ४० तर पूर्वोत्तरमध्ये ४५ पर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त होत आहे. व्हिक्टोरियात ८२ हजार हेक्टरवरील क्षेत्र नष्ट झाले आहे. या महाभयंकर आगीत तेथील वन्यजीवन खाक झालं आहे.
ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांचा भारत दौरा रद्द
ऑस्ट्रेलियातील आगीचे संकट पाहता पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी 13 जानेवारीपासून सुरूहोणारा आपला चार दिवसांचा दौरा रद्द केला आहे. अर्थात, आगामी महिन्यात आपला दौरा पुन्हा निश्चित करू, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या दौºयात ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा करणार होते. स्कॉट मॉरिसन यांनी म्हटले आहे की, आमचा देश सध्या जंगलातील भीषण आगीच्या संकटांचा सामना करत आहे. त्यामुळे नागरिकांना मदत करण्याकडे आमचे लक्ष केंद्रित आहे.