पाकिस्तान अन् अफगाणिस्तान सीमेवर क्रॉस बॉर्डर फायरींग; शेकडो कुटुबांनी घरं सोडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 15:52 IST2025-01-10T15:50:36+5:302025-01-10T15:52:08+5:30
गुरुवारी सीमेजवळील बाजौरमधील सालारझाई भागात हेलिकॉप्टरमधून गोळीबार करण्यात आला. पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानने या घटनांवर अधिकृतपणे भाष्य केलेले नाही.

पाकिस्तान अन् अफगाणिस्तान सीमेवर क्रॉस बॉर्डर फायरींग; शेकडो कुटुबांनी घरं सोडली
गेल्या काही दिवसापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर तणाव सुरू आहे. शुक्रवारी सकाळी या दोन्ही देशांच्या सीमेवर आणखी तणाव वाढला होता. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशाच्या सैनिकांनी सीमेवर फायरींग सुरु केले होते, हा गोळीबार पूर्व अफगाणिस्तानच्या कुनार येथे झाला. यामुळे तिथेली शेकडो कुटुंबीयांनी आपली घरं सोडली आहेत.
कॅनडाला मिळणार पहिला हिंदू पंतप्रधान? भारतीय वंशाच्या नेत्याने ठोकला दावा, कोण आहेत ते?
मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने शुक्रवारी १.३० वाजता सरकानो जिल्ह्याजवळ रोकेट हल्ले केले. या रॉकेट्सने अनेक घरांचे नुकसान केले. या हल्ल्यात १० जनावरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे अनेक कुटुबांनी आपली घरे सोडली आहेत. अफगाणिस्तानकडूनही गोळीबार करण्यात आला आहे.
गुरुवारी सीमेजवळील बाजौरमधील सालारझाई भागात हेलिकॉप्टरमधून गोळीबार करण्यात आला. पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानने या घटनांवर अधिकृतपणे भाष्य केलेले नाही.
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर परिसरात तणाव वाढला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानचे दहशतवादी पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या पहारा असलेल्या चौकीवर त्यांचा झेंडा फडकवताना दिसत आहेत. या व्हिडिओमुळे या भागातील टीटीपीच्या कारवायांबद्दल चिंता व्यक्त झाली आहे.
सीमेपलीकडून होणारा हिंसाचार हा एक मोठा मुद्दा बनला आहे, गेल्या काही दिवसापासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन्ही देशात तणाव वाढला आहे. सुरक्षेसाठी धोका निर्माण करणाऱ्या दहशतवादी गटांना आश्रय देत असल्याचा आरोप दोन्ही देश करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, कुनारमध्ये झालेल्या गोळीबारामुळे शेकडो कुटुंबे विस्थापित झाली आहेत. नागरिकांची संख्या वाढत असतानाही, पाकिस्तानी आणि अफगाण अधिकाऱ्यांनी या घटनेबद्दल कोणतेही अधिकृत विधान देण्यास टाळाटाळ केली आहे. परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे.