क्रूरतेची परिसीमा ...प्रियकराचं ह्रदय कापून बाहेर काढणा-या प्रेयसीला फाशीची शिक्षा

By admin | Published: March 29, 2016 07:29 PM2016-03-29T19:29:10+5:302016-03-29T19:33:46+5:30

बांगलादेशमध्ये प्रेयसीने क्रूरतेची परिसीमा गाठत प्रियकराची हत्या करुन त्याचं ह्रदय कापून बाहेर काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे

The cruelty of cruelty ... The death sentence for the lover of a beloved lover | क्रूरतेची परिसीमा ...प्रियकराचं ह्रदय कापून बाहेर काढणा-या प्रेयसीला फाशीची शिक्षा

क्रूरतेची परिसीमा ...प्रियकराचं ह्रदय कापून बाहेर काढणा-या प्रेयसीला फाशीची शिक्षा

Next
>ऑनलाइन लोकमत - 
ढाका, दि. २९ - बांगलादेशमध्ये प्रेयसीने क्रूरतेची परिसीमा गाठत प्रियकराची हत्या करुन त्याचं ह्रदय कापून बाहेर काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराचा गळा कापून त्याची हत्या करणा-या या प्रेयसीला बांगलादेशमधील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. फातेमा अख्तर सोनाली असं या तरुणीचं नाव आहे. फातेमाला फासावर लटकवलं गेलं तर महिलेला फासावर लटकवण्यात येणारी ही बांगलादेशमधील पहिलीच घटना असेल. 
 
फातेमा आणि एमददुल यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र  एमददुलने लग्नास नकार दिला होता. तसंच त्यांच्यातील सेक्स करतानाचे व्हिडिओ त्याने रेकॉर्ड केले होते. याच रागातून एमददुलची हत्या केली असल्याची कबुली फातेमाने न्यायालयात दिली आहे. हत्या करण्यापुर्वी फातेमाने सॉफ्टड्रींकमध्ये झोपेच्या गोळ्या टाकल्या होत्या. एमददुल बेशुद्ध झाल्यानंतर तिने त्याचे हात, पाय बांधले आणि त्याचा गळा चिरुन हत्या केली. फातेमा एवढ्यावरच थांबली नाही तर तिने धारदार शस्त्राने एमददुलच्या छातीवर वार करुन त्याचं ह्रदय बाहेर काढलं. 
 
न्यायालयात फातेमाला असं का केलं विचारलं असता 'मला त्याचं ह्रदय किती मोठं आहे याबद्द्ल उत्कंठा होती. अशा प्रकारचे धाडसी गुन्हे करण्यासाठी माणसाकडे खुप मोठे ह्रदय असलं पाहिजे', त्यामुळे मी असं कृत्य केल्याचं सांगितलं. फातेमाने मार्च 2014मध्ये ही हत्या केली आहे. न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला ती वरील न्यायालयात आव्हान देऊ शकते. 
 
जर तिची फाशीची शिक्षा कायम ठेवली तर फासावर जाणारी बांगलादेशमधील ती पहिली महिला असेल अशी माहिती कारागृहाचे उपनिरीक्षक टिपू सुलतान यांनी दिली आहे. महिलेला फाशीची शिक्षा होणं ही दुर्मिळ घटना आहे. मात्र ही केसदेखील अपवादात्मक असल्याचं वकील काजी शब्बीर अहमद यांनी सांगितलं आहे.
 

Web Title: The cruelty of cruelty ... The death sentence for the lover of a beloved lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.