Adult Star मिया खलिफावर भडकले क्यूबाचे राष्ट्रपती, नॅशनल टीव्हीसमोर केले तिच्यावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2021 12:51 PM2021-07-15T12:51:28+5:302021-07-15T12:52:47+5:30

ते मिया खलीफावर आरोप लावत म्हणाले की, ती अमेरिकन सरकारसोबत मिळून काम करत आहे. ती क्यूबा सरकार विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या आगीत तेल ओतायचं काम करत आहे.

Cuban president Miguel Diaz Canel slams adult star Mia Khalifa for adding fuel to anti govt protest in Havana | Adult Star मिया खलिफावर भडकले क्यूबाचे राष्ट्रपती, नॅशनल टीव्हीसमोर केले तिच्यावर गंभीर आरोप

Adult Star मिया खलिफावर भडकले क्यूबाचे राष्ट्रपती, नॅशनल टीव्हीसमोर केले तिच्यावर गंभीर आरोप

Next

क्यूबामध्ये (Cuba)  सुरू असलेल्या आंदोलनाबाबत राष्ट्रपती मिगेल दियाज कनेल (Miguel Diaz-Canel)  यांनी अॅडल्ट स्टार मिया खलीफाला (Mia Khalifa) जबाबदार धरलं आहे. ते मिया खलीफावर आरोप लावत म्हणाले की, ती अमेरिकन सरकारसोबत मिळून काम करत आहे. ती क्यूबा सरकार विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या आगीत तेल ओतायचं काम करत आहे. या आरोपांनंतर मिया खलीफाने राष्ट्रपती कनेल यांना उत्तर दिलं आहे.

क्यूबामध्ये सरकारविरोधात आंदोलन

डेली स्टारमध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, क्यूबाची राजधानी हवानामध्ये लोक सध्या आंदोलन करत आहेत. सरकार विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनकर्त्यांची पोलीस आणि सरकारच्या समर्थक लोकांसोबत झडपही झाली आहे. आंदोलनकर्ते मोफत वॅक्सीन आणि वाढत्या महागाईवरून क्यूबातील कम्युनिस्ट सरकार विरोधात रस्त्यावर उतरले आहेत.

मिया खलिफाने दिलं स्पष्टीकरण

क्यूबाच्या राष्ट्रपतींनी नॅशनल टीव्हीवर येऊन मिया खलिफावर गंभीर आरोप लावले आहेत. यावर मिया खलिफाने ट्विट करत सांगितलं की, मला लोकांना तुमच्या अमानवतेबाबत जागरूक करण्यासाठी कोणतंही सरकार पैसे देत नाहीये. मी हे फ्रीमध्ये आणि आपला वेळ देऊन करते'.

दरम्यान, क्यूबाची राजधानी हवानामध्ये राष्ट्रपती मिगेल दियाज कनेलचं सरकारच्या राजकीय आणि आर्थिक नीतिंविरोधात लोक आंदोलन करत आहेत. गेल्या ११ आणि १२ जुलैलला पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये झडप झाली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे क्यूबातील सरकार दबावात आहे.
 

Web Title: Cuban president Miguel Diaz Canel slams adult star Mia Khalifa for adding fuel to anti govt protest in Havana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.