अमेरिकेत तेलवाहिनीवर सायबर हल्ला, विभागीय आणीबाणी जाहीर, तेलपुरवठा ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 06:06 AM2021-05-11T06:06:06+5:302021-05-11T06:10:49+5:30

सर्वात मोठ्या तेलवाहिनीच्या यंत्रणेवरच घाला घालण्यात आला असून, त्यामुळे विभागीय आणीबाणी जाहीर करण्याची नामुष्की अमेरिकी प्रशासनावर ओढवली आहे.

Cyber attack on oil pipeline in US, regional emergency declared, oil supply cut off | अमेरिकेत तेलवाहिनीवर सायबर हल्ला, विभागीय आणीबाणी जाहीर, तेलपुरवठा ठप्प

अमेरिकेत तेलवाहिनीवर सायबर हल्ला, विभागीय आणीबाणी जाहीर, तेलपुरवठा ठप्प

googlenewsNext

सायबर हल्ला म्हटले की, मुंबईत काही तास ठप्प झालेला वीजपुरवठा आठवतो. चीनने केलेल्या सायबर हल्ल्यामुळे मुंबईतील वीजपुरवठा ठप्प झाल्याचे अलीकडेच निदर्शनास आले. असाच सायबर हल्ला अमेरिकेतही झाला आहे. सर्वात मोठ्या तेलवाहिनीच्या यंत्रणेवरच घाला घालण्यात आला असून, त्यामुळे विभागीय आणीबाणी जाहीर करण्याची नामुष्की अमेरिकी प्रशासनावर ओढवली आहे.

- ५कोटी लोकांना या तेलवाहिनीच्या सेवेचा लाभ होतो.
- लांबी ८,८५० किमी, अमेरिकेतील १८ राज्यांमधून ती जाते.
- ३० लाख बॅरलहून अधिक तेल वाहून नेण्याची या वाहिनीची 
क्षमता आहे. त्यात विमानांसाठी लागणाऱ्या इंधनापासून पेट्रोल 
आणि डिझेल इत्यादींपर्यंतचा समावेश आहे.

कोणी केला सायबर हल्ला?
- डार्कसाईड रॅन्समवेअर या हॅकर्सच्या  गटाने हा हल्ला घडवून आणला आहे.
- कोलोनियल पाईपलाईनच्या सॉफ्टवेअर प्रणालीवर डार्कसाईड रॅन्समवेअरच्या हॅकर्सनी हल्ला करून त्यांचा १०० जीबीचा डेटा ओलिस ठेवला आहे.
- हॅकर्सनी कंपनीकडे २० लाख डॉलर्सची मागणी केली आहे. 

खंडणी न दिल्यास कंपनीचा १०० जीबीचा डेटा लीक केला जाईल, अशी धमकीही देण्यात आली आहे.

परिणाम काय?
- कोलोनियल पाईपलाईन कंपनीवर झालेल्या सायबर हल्ल्यामुळे तेलवाहिनीच्या सर्व यंत्रणा ठप्प पडल्या आहेत.
- त्यामुळे इंधन पुरवठा खंडित झाला असून, १८ राज्यांना त्याची झळ बसली आहे.
- या सर्व अडचणीतून मार्ग काढण्यासाठी अमेरिकी प्रशासनाच्या 
- सर्व यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत.
- इंधन पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी रस्तामार्गे वाहतूक करण्यात येत आहे.
- परंतु, वाहतुकीला उशीर होणे अपेक्षित असल्याने इंधनाच्या किमतीत दोन ते तीन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.
 

Web Title: Cyber attack on oil pipeline in US, regional emergency declared, oil supply cut off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.