"मोफत, ओपन इंटरनेटवर जगभरात होत आहेत हल्ले"
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2021 06:03 AM2021-07-14T06:03:19+5:302021-07-14T06:04:54+5:30
Google CEO : ‘गुगल’चे सीईओ सुंदर पिचई यांचा इशारा.
लॉस एंजेल्स : जगभरात मोफत आणि ओपन इंटरनेटवर हल्ले होत असल्याचा इशारा ‘गुगल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचई यांनी दिला. कॅलिफोर्निया येथील सिलिकॉन व्हॅलीमध्ये ‘गुगल’च्या मुख्यालयात पिचई यांनी दिलेल्या मुलाखतीत हा इशारा दिला. अनेक देशांकडून माहितीच्या प्रवाहावर निर्बंध लादले जात असून, हे मॉडेल गृहित धरले जात असल्याचे पिचई यांनी सांगितले.
‘गुगल’मध्ये सर्वोच्च पदावर कार्यरत असलेले पिचई हे मूळचे तामिळनाडूचे. आपण आज जे काही आहोत, त्यात भारताचा सर्वात मोठा वाटा असल्याचे पिचई यांनी मुलाखतीमध्ये सांगितले. ते म्हणाले की, मी एक अमेरिकन नागरिक आहे. मात्र, आजही माझ्या अंत:करणात भारतच आहे. भारतातच माझी मुळे रोवली आहेत, असे ते म्हणाले. चीनमधील सर्व्हेलंसवर आधारित इंटरनेट मॉडेलचा प्रभाव वाढत आहे का? या प्रश्नावर पिचई म्हणाले की, फ्री आणि ओपन इंटरनेटवर हल्ले होत आहेत. आमची कोणतीही मोठी उत्पादने आणि सेवा चीनमध्ये उपलब्ध नाहीत.
‘एआय’ सर्वात प्रगल्भ
आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर पिचई म्हणाले की, याकडे मी सर्वाधिक शक्तिशाली तंत्रज्ञानाच्या रूपात पाहतो. अग्नी, वीज, इंटरनेटपेक्षाही हे तंत्रज्ञान सर्वाधिक प्रगल्भ आहे.
२० टक्क्यांहून अधिक कर
आम्ही जगातील सर्वात मोठ्या करदात्यांपैकी एक आहोत. गेल्या दशकातील सरासरीकडे पाहिल्यास आम्ही २० टक्क्यांहून अधिक कर भरला आहे.
सर्वांना ‘टू फॅक्टर ऑथेंटिकेशन’ वापरणे हिताचे आहे. तसेच नवे तंत्रज्ञान तपासून पाहण्यासाठी आपण ते सातत्याने हॅंडसेट बदलत असतो.
सुंदर पिचई, गुगल, सीईओ