फिलीपीन्सला चक्रीवादळाचा धोका
By admin | Published: October 18, 2015 02:07 AM2015-10-18T02:07:11+5:302015-10-18T02:07:11+5:30
फिलीपीन्सच्या लुजोन बेटाला कोप्पू चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता असल्याच्या दृष्टिकोनातून विमान वाहतूक रद्द करण्यासह नागरिक आणि पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी
मनिला : फिलीपीन्सच्या लुजोन बेटाला कोप्पू चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता असल्याच्या दृष्टिकोनातून विमान वाहतूक रद्द करण्यासह नागरिक आणि पर्यटकांना सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्राध्यक्ष बेनिनो आक्किनो यांनी लोकांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले. घाबरण्याऐवजी वादळाला तोंड देण्याची तयारी करावी, असे ते म्हणाले. आक्किनो यांनी यापूर्वी २०१३ मध्ये असा संदेश दिला होता. तेव्हा हैयान वादळामुळे ६३०० लोक मृत्युमुखी पडण्यासह लाखो लोक बेघर झाले होते.
१६० कि.मी. प्रतितास एवढ्या वेगाने वारे वाहत आहेत. सध्या वादळ औरोरा प्रांतातील बालेरच्या पूर्वेकडे तीनशे कि.मी. अंतरावर असून ते येत्या १२ ते १८ तासांत ते लुजोन बेटावर धडकण्याची शक्यता आहे. वादळाच्या धोक्यांमुळे किनारपट्टी व सखल भागातील ३०० नागरिकांनी यापूर्वीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले आहे. वादळामुळे पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटना घडू शकतात, असे आपत्ती विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.