बांगलादेशात ‘सीतरंग’ चक्रीवादळामुळे 5 जणांचा मृत्यू, ढाकासह बहुतांश भागात पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2022 06:59 AM2022-10-25T06:59:19+5:302022-10-25T07:00:18+5:30
cyclone sitrang : आपत्ती मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने एएफपीने सांगितले की, बरगुना, नराइल, सिराजगंज जिल्हे आणि भोला बेट जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
ढाका : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या सीतरंग चक्रीवादळाचा प्रभाव आता दिसून येत आहे. सीतरंग चक्रीवादळबांगलादेशात पोहोचले असून ते रात्री उशिरा देशाच्या नैऋत्य किनारपट्टीवर धडकले. दरम्यान, बांगलादेशात सीतरंग चक्रीवादळाच्या तडाख्याने पाच जणांचा मृत्यू झाला. आपत्ती मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाच्या प्रवक्त्याच्या हवाल्याने एएफपीने सांगितले की, बरगुना, नराइल, सिराजगंज जिल्हे आणि भोला बेट जिल्ह्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
भारतीय हवामान खात्याने माहिती दिली आहे की, चक्रीवादळ सीतरंग 24 ऑक्टोबर रोजी रात्री 11.30 वाजता ढाकापासून 40 किमी पूर्वेला कोस्टल बांगलादेशच्या दिशेने केंद्रित झाले आहे. ते उत्तर-ईशान्येकडे सरकण्याची आणि पुढील 6 तासांमध्ये चिन्हांकित कमी दाबाच्या क्षेत्रात कमकुवत होण्याची दाट शक्यता आहे. तर या वादळाच्या प्रभावामुळे पूर्व, ओडिसा, पश्चिम बंगाल, बांगलादेशाच्या किनाऱ्यावर पावसाच्या ढग तयार झाले आहेत. ईशान्य भारतातील राज्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Cyclonic storm 'Sitrang' lay centered, at 11.30pm Oct 24, over coastal Bangladesh about 40km east of Dhaka. It's very likely to move north-northeastwards & weaken into a depression during next 6 hours & further into well-marked low-pressure area during subsequent 6 hours: IMD
— ANI (@ANI) October 24, 2022
याआधी सोमवारी बांगलादेशातील 2.19 लाखांहून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते. आपत्कालीन व्यवस्थापनाने आधीच एक अपडेट दिले होते की, ते रात्रीच्या वेळी दक्षिण-पश्चिम किनारपट्टीवर येऊ शकते. आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाचे प्रवक्ते मोहम्मद मोनिरुझमान यांनी सांगितले की, बांगलादेशी अधिकाऱ्यांनी 6,925 निवारा केंद्रे तयार केली आहेत, जिथे चक्रीवादळाच्या धोक्यामुळे बाधित लोक आश्रय घेऊ शकतात.
चक्रीवादळ सीतरंगमुळे दक्षिण-पश्चिम किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा प्रभाव आधीपासूनच दिसून येत आहे, तर ढाकासह देशातील बहुतांश भागात सतत पाऊस पडत आहे. हवामान खात्याने सोमवारी संध्याकाळी जारी केलेल्या आपल्या ताज्या सूचनांमध्ये, पायरा, मोंगला आणि चितगाव बंदरांना धोक्याचे सिग्नल वाढवण्यास सांगितले आणि कॉक्स बाजार बंदरांना 10 च्या प्रमाणात धोक्याचा सिग्नल क्रमांक 6 कायम ठेवण्याचा सल्ला दिला. तसेच, दक्षिण-पश्चिम पटुआखाली, भोला, बरगुना आणि झलकाठीला वादळाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे, इशारा असा हवामान खात्याने दिला आहे.