हृदयद्रावक! मुलीच्या वाढदिवसावरुन परतताना घेतली गुगल मॅपची मदत पण भयंकर घडलं, मृत्यूने गाठलं

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 12:58 PM2022-10-10T12:58:53+5:302022-10-10T13:00:54+5:30

जीपीएम नेटवर्कमुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. 

dad returning from birthday party dies as gps leads car off broken bridge | हृदयद्रावक! मुलीच्या वाढदिवसावरुन परतताना घेतली गुगल मॅपची मदत पण भयंकर घडलं, मृत्यूने गाठलं

हृदयद्रावक! मुलीच्या वाढदिवसावरुन परतताना घेतली गुगल मॅपची मदत पण भयंकर घडलं, मृत्यूने गाठलं

Next

आज गुगल मॅप ही प्रत्येकाची गरज बनली आहे. शहरात कुठेही जाण्यासाठी लोक त्याचा प्रचंड वापर करतात. गुगल मॅप्स हे जीपीएस म्हणजेच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमवर काम करते. उपग्रहाच्या मदतीने मार्ग दाखवले जातात. पण कधीकधी ते आपल्याला फसवतं. अशा बातम्या आपण रोज वाचत असतो. पण आज आपण ज्या घटनेबद्दल बोलणार आहोत ती अत्यंत हृदयद्रावक आहे. खराब जीपीएम नेटवर्कमुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. 

अमेरिकेमध्ये ही दुःखद घटना घडली आहे. एक व्यक्ती आपल्या मुलीच्या वाढदिवस साजरा करून परतत होता. फिल पॅक्ससन असं या व्यक्तीचं नाव असून तो दोन मुलांचा पिता आहे. पावसाळ्यात रात्री गाडी चालवत असताना तो नेव्हिगेशनसाठी जीपीएस वापरत होता. पण नंतर नेव्हिगेश सिस्टमने त्यांना चुकीच्या दिशेने वळवले. तिथे कोणतेही बॅरिकेड्स नव्हते. त्यामुळे रात्रीच्या वेळेस कार तुटलेल्या पुलावरून खाली पडली आणि व्यक्तीचा मृत्यू झाला. 

एका आठवड्यापूर्वी नॉर्थ कॅरोलिनाच्या हिकॉरी शहरात ही घटना घडली होती. पॅक्सनची सासू लिंडा मॅकफी कोएनिग यांनी फेसबुक सोशल नेटवर्किंग साइटवर तिच्या कुटुंबाला झालेल्या घटनेबाबत पोस्ट शेअर केली आहे. कोएनिगने लिहिले की, "अपघाताच्या रात्री फिलला GPS वरून दिशा मिळत होती कारण ती अंधारी आणि पावसाळी रात्र होती. नेव्हिगेशन सिस्टमने पॅक्सनला एका पुलाकडे मार्गदर्शन केले, ज्यामुळे नदीकडे नेले."

कोएनिगच्या म्हणण्यानुसार, जवळपास एक दशकापूर्वी हा पूल कोसळला होता, त्यानंतर कोणतीही दुरुस्ती केली गेली नाही. सासूने दावा केला की "पुलावर कोणतीही चिन्हे किंवा सुरक्षितता अडथळे नाहीत ज्यामुळे पॅक्सनला धोक्याचा इशारा दिला गेला नाही. हा पूर्णपणे टाळता येण्याजोगा अपघात होता. त्याच्या निधनावर आम्ही शोक व्यक्त करत आहोत" एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: dad returning from birthday party dies as gps leads car off broken bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.