दलाई लामा हे भ्रामक अभिनेते- चीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2017 06:25 PM2017-03-07T18:25:25+5:302017-03-07T18:35:19+5:30
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं दलाई लामा हे एक भ्रामक अभिनेते असल्याची टीका केली आहे.
ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 7 - चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं दलाई लामा हे एक भ्रामक अभिनेते असल्याची टीका केली आहे. तिबेटचे आध्यात्मिक गुरू यांनी एक मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी चीननं मेंदू गहाण ठेवला आहे, असं म्हटलं होतं. त्यालाच चीननं प्रत्युत्तर दिलं आहे. अमेरिकन विनोदी कलाकार जॉन ऑलिव्हर यांनी धर्मशाळा येथे दलाई लामा यांच्याशी तिबेटच्या मुद्द्यावर बातचीत केली होती. त्यावेळी त्यांनी चीनवर टीका केली होती.
चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जेंग शांग यांनी दलाई लामांच्या मुलाखतीकडे आम्ही मनोरंजनात्मक कार्यक्रम म्हणून पाहत असल्याचं सांगितलं आहे. दलाई लामांच्या मुलाखतीतील विधानं विनोदी आणि गमतीदार होती. मात्र दलाई लामांच्या खोट्या वक्तव्यानं सत्य कधीच बदलणार नाही. तिबेटचे 14वे धर्मगुरू दलाई लामा यांनी आध्यामिकतेच्या नावाखाली राजकारणाचा बुरखा पांघरला आहे. त्याआडूनच चीनच्या विरोधातील फुटीरतावादाचा उपक्रम ते राबवत आहेत.
आम्हाला वाटतं दलाई लामा हे एक भ्रामक अभिनेते असून, चित्रपटात ते खूप चांगलं काम करू शकतील. धोकादायक फुटीरतावादी म्हणून दलाई लामांना नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं पाहिजे. 1959मध्ये चिनी सरकारविरोधात दलाई लामांनी अयशस्वी उठाव केला होता. त्यानंतर ते भारतात पळून गेले होते. दलाई लामा हिंसेला समर्थन देत असून, त्यांना फक्त तिबेटला स्वायत्तता मिळवून द्यायची आहे, अशीही गंभीर टीका चीननं दलाई लामा यांच्यावर केली आहे. दलाई लामा हे दोन्ही बाजूनं कटुता पसरवत असून, त्यांना तिबेटमधलं बुद्धिजम स्वतःच्या ताब्यात ठेवायचं आहे. त्यासाठी त्यांचा पुनर्जन्म झाला आहे. तसेच दलाई लामा यांना आश्रय देऊन आपण चीनच्या तिबेट धोरणात काहीही फरक पडला नाहीत. उलट भारतानं त्यांना आश्रय दिल्यानं चीनचा वारंवार जळफळाट होत आहे.