भारतात प्रवास करणे धोक्याचे - अमेरिका

By Admin | Published: March 7, 2017 07:42 AM2017-03-07T07:42:46+5:302017-03-07T08:42:39+5:30

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नागरिकांसाठी ट्रॅव्हल्स अ‍ॅडवायझरी जारी केलं असून भारतात जहालमतवादी सक्रीय असल्याने तेथे प्रवास करणे धोक्याचे आहे असा इशारा दिला आहे.

Dangerous to travel to India - America | भारतात प्रवास करणे धोक्याचे - अमेरिका

भारतात प्रवास करणे धोक्याचे - अमेरिका

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

वॉशिंग्टन, दि. 7 - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नागरिकांसाठी ट्रॅव्हल्स अ‍ॅडवायझरी जारी केलं आहे. या अ‍ॅडवायझरीमध्ये नागरिकांनी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशचा प्रवास करू नये, अशी सूचना अमेरिकेकडून करण्यात आली आहे. भारतातही जहालमतवादी सक्रिय आहेत, असंही ट्रॅव्हल्स अ‍ॅडवायझरीमध्ये म्हटलं आहे.

अमेरिकन सरकारच्या मते, दक्षिण आशियातील दहशतवादी गट अमेरिकेतल्या नागरिकांना लक्ष्य करू शकतात, असंही अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या या अॅडवायजरीमधून सल्ला देण्यात आला आहे. तसेच अमेरिकेच्या लोकांनी अफगाणिस्तानात जाण्याचं टाळलं पाहिजे. या देशातील कोणताही भाग हा हिंसेतून मुक्त नाही, अॅडवायझरीमधून पाकिस्तानलाही लक्ष्य करण्यात आलं आहे. पाकिस्तानात अनेक दहशतवादी गट आणि जातीय समूह सक्रिय आहेत. पाकिस्तानातले दुसरे जहालमतवादी लोकंही अमेरिकेच्या नागरिकांना धोका पोहोचवू शकतात, असंही म्हटलं आहे.

(सात मुस्लिम देशातील नागरिकांचा अमेरिका प्रवेशाचा मार्ग मोकळा)

तत्पूर्वी सात मुस्लिम देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशबंदी करण्याच्या निर्णयावरून डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाला माघार घ्यावी लागली होती. वॉशिंग्टनमधील न्यायालयाने ट्रम्प यांच्या आदेशाची अंमलबजावणी करू, नये असा निर्णय दिला होता. न्यूयॉर्क, कॅलिफोर्निया आणि मासाच्युसेटस येथील न्यायालयानेही असाच निकाल दिला होता. त्यामुळे ट्रम्प प्रशासनाला आपल्या निर्णयावरून माघार घ्यावी लागली होती. इराण, इराक, लिबिया, सोमालिया, सुदान, सीरिया आणि येमेन या मुस्लीम देशांतील नागरिकांचा अमेरिकेत प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ट्रम्प यांच्या आदेशामुळे देशातील नागरिकांना ९० दिवस प्रवेश बंदी लागू झाली होती. ज्यांच्याकडे वैध अमेरिकी व्हिसा आहे व ग्रीन कार्ड आहेत त्यांनाही याचा फटका बसला होता. मात्र आता ट्रम्प यांनी स्वतःच्याच देशातील नागरिकांना पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशात जाण्याचं टाळण्याचा सल्ला दिला आहे.   

Web Title: Dangerous to travel to India - America

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.