यूरोपच्या 'या' 3 शहरांखालची जमीन तापतीये, ज्वालामुखींमुळे धोका वाढला...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 11:13 AM2020-06-11T11:13:01+5:302020-06-11T11:18:26+5:30
येथील जमिनीखालील लाव्हारसाचा प्रवाह वाढलाय. ही स्थिती संपूर्ण पश्चिम यूरोपमध्ये आहे, पण सर्वात जास्त धोका जर्मनीतील तीन शहरांना आहे.
एकीकडे कोरोनाने जगभरात हाहाकार माजला असून अशात यूरोपमधून एक काळजी वाढवणारी बातमी समोर आली आहे. यूरोपातील तीन शहरांखाली ज्वालामुखींची सक्रियता वाढली आहे. जर्मनीतील तीन शहरांखाली हे ज्वालामुखी अधिक सक्रिय झाले आहेत. येथील जमिनीखालील लाव्हारसाचा प्रवाह वाढलाय. ही स्थिती संपूर्ण पश्चिम यूरोपमध्ये आहे, पण सर्वात जास्त धोका जर्मनीतील तीन शहरांना आहे.
यूरोपमधून मिळवण्यात आलेल्या डेटानुसार, यूरोपमध्ये जमिनीखाली ज्वालामुखीची सक्रियता फार जास्त वाढली आहे. याचा रिपोर्ट जिओफिजिकल जर्नल इंटरनॅशनलमध्ये प्रकाशित झालाय. यूरोपच्या उत्तर-पश्चिम भागातील जमिनीखाली हालचाल फार जास्त वाढली आहे.
जमिनीखाली लाव्हारसाचा प्रवाह वाढल्याने पश्चिम-मध्य जर्मनीतील तीन शहरे धोक्यात आली आहेत. ही तीन शहरे जर्मनीच्या द आयफेल रीजनमध्ये येतात. आशेन, ट्रायर आणि कोबलेंज अशी या तीन शहरांती नावे आहेत.
द आयफेल रीजन हजारो वर्षांपासून ज्वालामुखीचं केंद्र राहिला आहे. तुम्हाला या परिसरात अनेक गोलाकार छोटे-मोठे सरोवर दिसतील. हे हजारो वर्षांपूर्वी ज्वालामुखीमुळे तयार झाले आहेत. यांना जर्मनीमध्ये मार्स म्हणतात.
याच ज्वालामुखीय हालचालीमुळे द आयफेल रीजनमध्ये सर्वात मोठं सरोवर लाशेर सी तयार झालं. असे म्हणतात की, इथे 13 हजार वर्षाआधी एक फार मोठा विस्फोट झाला होता. ज्यामुळे हा सरोवर तयार झाला.
प्राध्यापक कॉर्न क्रीमर म्हणाले की, जगभरातील जास्तीत जास्त वैज्ञानिकांचं हेच मत आहे की, द आयफेल रीजनमध्ये ज्वालामुखींची हालचाल बंद झाली आहे. पण जर सर्वच बिंदूंवर लक्ष दिलं तर हे कळून येतं की, उत्तर-पश्चिम यूरोपच्या जमिनीखाली खूपकाही भयावह घडत आहे.
प्राध्यापक क्रीमर यांनी सांगितले की, द आयफेल रीजनमध्ये येणारे देश लग्जमबर्ग, पूर्व बेल्जिअम, नेदरलॅंडचा दक्षिण भाग लिमबर्गची जमीन वर उचलली जात आहे. आयफेल रीजनमध्ये होत असलेले हे बदल इतके वेगवान आहेत की, ते सहजपणे लक्षात येत आहेत.
क्रीमर सांगतात की, आमच्या रिसर्चमधून समोर येतं की, लाशेर सी आणि आयफेल रीजन्या जमिनीखाली मॅग्मा म्हणजे लाव्हारस उकडत आहे. म्हणजे आयफेल रीजन आजही सक्रिय ज्वालामुखीच्या वर बसलेला आहे.
जमिनीच्या खाली सतत वाहत असलेल्या लाव्हारसामुळे केवळ ज्वालामुखीचा उद्रेकच होणार नाही तर या संपूर्ण भागात भूकंप येऊ शकतात किंवा अनेकदा पृथ्वीला झटके बसू शकतात. पण याचा अर्थ हा नाही की, ज्वालामुखीचा उद्रेक होणे किंवा भूकंप इतक्यात येईल. पण आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे.
आयफेल रीजन 5300 वर्ग किमोमीटरमध्ये पसरला आहे. याची एका बाजूची लांबी 100 किलोमीटर आहे. या क्षेत्रात जर्मनी, बेल्जिअम आणि लग्जमबर्ग हे तीन देश पूर्णपणे येतात. त्यासोबतच इतरही काही यूरोपीय देशांचे भाग जुळलेले आहेत.
Lockdown: हेच ऐकायचं बाकी होतं! कोरोनामुळे लग्न रद्द झालं तरी ‘या’ कपल्सची हनीमूनला जाण्याची तयारी
दिलासादायक : जगातल्या 'या' पहिल्या शहरात 'हर्ड इम्यूनिटी'नं होतोय कोरोनाचा खात्मा! पण...