Darling River Fish Death : ऑस्ट्रेलियात मोठे नैसर्गिक संकट; सर्वात मोठ्या नदीमध्ये कोट्यवधी माशांचा मृत्यू, कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 04:35 PM2023-03-19T16:35:00+5:302023-03-19T16:36:34+5:30

Darling River Fish Death : नदीच्या पाण्यावर सर्वत्र मृत माशाची चादर पसरली आहे.

Darling River Fish Death : Major Natural Disaster in Australia; Millions of fishes die in the biggest river, what is the reason..? | Darling River Fish Death : ऑस्ट्रेलियात मोठे नैसर्गिक संकट; सर्वात मोठ्या नदीमध्ये कोट्यवधी माशांचा मृत्यू, कारण काय..?

Darling River Fish Death : ऑस्ट्रेलियात मोठे नैसर्गिक संकट; सर्वात मोठ्या नदीमध्ये कोट्यवधी माशांचा मृत्यू, कारण काय..?

googlenewsNext

Darling River Fish Death : ऑस्ट्रेलियातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी असलेल्या डार्लिंग रिव्हरमध्ये मोठे संकट आले आहे. नदीतील  कोट्यवधी मासे मरण पावले आहेत. 2018 नंतर नदीवर मृत माशांची चादर पसरण्याची ही तिसरी घटना आहे. न्यू साउथ वेल्थ अॅडमिनिस्ट्रेशनने याला दुजोरा दिला आहे. या मृत माशांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जाणून घ्या अशी परिस्थिती का आणि कशी घडली... 

मीडिया रिपोर्टनुसार, माशांच्या मृत्यूचे कारण पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनची कमतरता आहे. अधिकाऱ्यांना परिस्थितीची चौकशी करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. मृत माशांमुळे एवढी दुर्गंधी पसरली आहे की, नदीकाठी राहणाऱ्या लोकांचे मोठे हाल झाले आहे. पाण्यातील ऑक्सिजन कुठे गेले, याचे उत्तर शोधले जात आहे.

पाण्यात राहणाऱ्या जीवांसाठी ठराविक प्रमाणात ऑक्सिजन मिळणे आवश्यक असते. धावत्या पाण्यामध्ये ऑक्सिजनचे प्रमाण भरपूर असते. पाण्यात असलेले बॅक्टेरिया आणि इतर जीव या ऑक्सिजनमुळे जिवंत राहतात. कोणत्याही नदी किंवा तलावातील पाण्याची हालचाल कमी होते, तेव्हा त्यामध्ये शैवाल आणि सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढू लागते. ते पाण्यातील ऑक्सिजनची पातळी वेगाने कमी करतात. त्यामुळे पाण्यातील माशांसारख्या सजीवांवर थेट परिणाम होत असतो. 

पाण्यातील ऑक्सिजनची पातळी तपासण्यासाठी वॉटर किटचा वापर केला जातो. त्याच्या मदतीने पाण्याची गुणवत्ता तपासली जाते. उदाहरणार्थ, पाण्याचे तापमान काय आहे, पीएच पातळी काय आहे आणि त्यात किती ऑक्सिजन आहे. या आधारे ते पाणी जलचरांसाठी योग्य आहे की नाही हे समजते.  माशांना पाण्यात ऑक्सिजन न मिळाल्याने त्यांचा मृत्यू होतो. 

 

Web Title: Darling River Fish Death : Major Natural Disaster in Australia; Millions of fishes die in the biggest river, what is the reason..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.