CoronaVirus News: चीनचा डेटा लीक! 84 हजार कोरोनाचे रुग्ण नाही; लाखांमध्ये आहे आकडा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 01:02 PM2020-05-16T13:02:45+5:302020-05-16T13:09:35+5:30
नवी दिल्ली: चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरातील अन्य देशांना आपल्या विळख्यात घेतलं आहे. जगभरात आतापर्यत 46 ...
नवी दिल्ली: चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरातील अन्य देशांना आपल्या विळख्यात घेतलं आहे. जगभरात आतापर्यत 46 लाखहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली असून 3 लाख 8 हजारांपेक्षा जास्त लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
चीन कोरोनाबाधितांची खरी संख्या लपवत असल्याचा दावा गेल्या काही दिवासंमध्ये वारंवार करण्यात येत आहे. मात्र त्याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आली नव्हती. परंतु आता चीनच्या संरक्षण तंत्रज्ञान विद्यापीठातूनच एक डेटा लीक झाला आहे. या डेटामध्ये चीनमधील कोरोनाग्रस्तांबाबत धक्कादाय माहिती जगासमोर आली आहे.
चीनमध्ये आतापर्यत 84,029 लोकांना कोरोनाची लागण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत अधिकृत माहिती देखील चीनने दिली आहे. मात्र चीनच्या राष्ट्रीय संरक्षण तंत्रज्ञान विद्यापीठमधूल लीक झालेल्या डेटानूसार चीनमध्ये एकूण 6.4 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे.
लीक झालेल्या डेटामध्ये देशातील 230 शहरांमधील 6.4 लाख लोकांना कोरोना झाला असल्याची माहिती आहे. यामध्ये कोणत्या तारखेला प्रथम रुग्ण आढळून आला होता. तसेच फेब्रुवारी ते एप्रिलपर्यतच्या किती जणांना कोरोनाची लागण झाली आहे, याबाबत माहिती देण्यात आली आहे. यामध्ये रुग्णालय, निवासी अपार्टमेंट्स, हॉटेल, सुपरमार्केट, रेल्वे स्थानक, शाळा आणि अगदी केएफसी या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळले असल्याची माहिती या डेटामध्ये देण्यात आली आहे.
चीनमध्ये 6. 4 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र ही संख्या जास्त किंवा कमी देखील असू शकते. राष्ट्रीय संरक्षण तंत्रज्ञान विद्यापीठाने हा डेटा कसा गोळा केला याबाबत माहिती दिलेली नाही. मात्र विविध सार्वजनिक संसाधनांची मदत घेत माहिती गोळा केली असल्याचा दावा विद्यापाठाकडून करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 46 लाखांवर; 3 लाख लोकांचा मृत्यू
CoronaVirus News : बापरे! स्मार्टफोनमुळे पसरू शकतो कोरोना; डॉक्टरांनी दिला थेट 'हा' इशारा
'अणुबॉम्ब टाकायला जातोय...'; नौदलाच्या पायलटने हटके अंदाजात मागितली लग्नासाठी सुट्टी, पत्र व्हायरल
कोरोनाच्या संकटात देशाला 'अम्फान' चक्रीवादळाचा धोका! 'या' राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता
CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये 200 चिमुकल्यांचा वाचवला जीव, रक्ताचं नातं जोडणारा अवलिया
CoronaVirus News : सरकारने मागवले 'हे' खास मशीन, आता 24 तासांत होणार 1200 सँपल टेस्ट