आईच्या भेटीसाठी मुलीचा जीव कासावीस, पार केला मृत्यूचा पुल; वाचून तुमच्या डोळ्यात येईल पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 04:31 PM2022-03-03T16:31:54+5:302022-03-03T16:43:18+5:30

पुरामुळे ताटातूट झालेल्या मायलेकीचा हा फोटो व्हायरल होतो आहेत. ज्यात आईला भेटण्यासाठी लेकीची धडपड दिसते आहे. आईपर्यंत पोहोचण्यासाठी तिने आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही. 'मृत्यूचा पूल'च तिने ओलांडला आहे

daughter cross broken bridge to meet her mother in flood | आईच्या भेटीसाठी मुलीचा जीव कासावीस, पार केला मृत्यूचा पुल; वाचून तुमच्या डोळ्यात येईल पाणी

आईच्या भेटीसाठी मुलीचा जीव कासावीस, पार केला मृत्यूचा पुल; वाचून तुमच्या डोळ्यात येईल पाणी

Next

मलेशियात (Malaysia) पुराने (Malaysian Flood) हाहाकार माजवला आहे. सोशल मीडियावर बरेच फोटो व्हायरल होत आहेत. नुकताच एक फोटो व्हायरल झाला आहे. पुरामुळे ताटातूट झालेल्या मायलेकीचा हा फोटो व्हायरल होतो आहेत. ज्यात आईला भेटण्यासाठी लेकीची धडपड दिसते आहे. आईपर्यंत पोहोचण्यासाठी तिने आपल्या जीवाचीही पर्वा केली नाही. 'मृत्यूचा पूल'च तिने ओलांडला आहे (Daughter mother reunite in Malaysia flood).

पुरामुळे आई आणि लेक एकमेकांपासून वेगळे झाले होते. दोन दिवसांनंतर त्या दोघी एकमेकांसमोर आल्या. आईला पाहताच मुलगी तिला भेटण्यासाठी कासावीस झाली. त्यानंतर तिने खतरनाक पाऊल उचललं. कॉस्मोच्या रिपोर्टनुसार दोन दिवसांसाठी या मायलेकी वेगळ्या झाल्या होत्या. आपण आपल्या आईला आता कायमचं गमावलं असं तिला वाटत होतं. अचानक एक दिवस तिला तिची आई दिसली. पण तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तिच्यासमोर मृत्यूच होता.

पूर आलेल्या नदीच्या खवळलेल्या पाण्यावर एक तुटलेला ब्रीज होता. पुलाजवळच एक विजेची तारही होती. त्यामुळे हा ब्रीज म्हणजे मृत्यूचाच पूल होता कारण त्यावरून जाणं म्हणजे जीव धोक्यात घालणं. थोडी जरी चूक झाली असती, पूल तुटला असता किंवा विजेच्या तारेचा झटका लागला असता तर तिचा मृत्यू झाला असता.

पण तरी मुलीला समोर दिसत होती ती फक्त आई. तिच्यासमोर तिने आपल्या जीवाची पर्वा केली नाही. हा पूल ओलांडत ती नदीच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर आपल्या आईकडे गेली आणि दोघींनीही एकमेकांना मिठी मारली. ही घटना मलेशियाच्या टेरेंगगनूमधील असल्याचं सांगितलं जातं आहे. आईला भेटण्यासाठी लेकीने जीव धोक्यात टाकल्याचा आणि मायलेकीच्या या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Web Title: daughter cross broken bridge to meet her mother in flood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.