दुख तो अपना साथी है

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 04:03 AM2017-07-29T04:03:09+5:302017-07-29T04:03:17+5:30

सुखाचे साथीदार अनेक असतात; पण दु:खात मात्र कोणी साथ देत नाही, असं नेहमीच म्हटलं जातं. जगाच्या पाठीवर कमी-अधिक प्रमाणात हेच अनुभव येत असतात.

daukha-tao-apanaa-saathai-haai | दुख तो अपना साथी है

दुख तो अपना साथी है

Next

सुखाचे साथीदार अनेक असतात; पण दु:खात मात्र कोणी साथ देत नाही, असं नेहमीच म्हटलं जातं. जगाच्या पाठीवर कमी-अधिक प्रमाणात हेच अनुभव येत असतात. जपानमधील एक व्यक्ती मात्र याला अपवाद आहे. कारण, तो सर्वांचंच दु:ख वाटून घेत असतो. या व्यक्तीचं नाव आहे टाकानोबू निशीमोटो या ४५ वयाच्या व्यक्तीनं २० वर्षांच्या करिअरमध्ये अनेक नोकºया केल्या. आता त्यांनी नवा व्यवसाय सुरूकेला आहे. ते आता दुसºयांचं दु:ख वाटून घेतात, समजून घेतात आणि बदल्यात पैसे घेतात. कदाचित आश्चर्य वाटेल, पण टाकानोबू निशीमोटो यांच्यासाठी दु:ख ऐकून, समजावून घेणं ही आता सवयीची बाब झाली आहे. निशीमोटो एक सामान्य व्यक्ती आहेत. पण, ते दुसºयांना चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकतात. लोक आपलं दु:ख व्यक्त करण्यासाठी निशीमोटो यांना बोलावून घेतात.
निशीमोटो त्यांना भेटून सल्ला देतात, दु:खातून बाहेर पडण्याचा मार्ग सुचवतात. दु:ख ऐकून घेण्याची एक तासाची त्यांची फी आहे ५०० रुपये. त्यांची वेबसाइट आहे. त्यावर भेट घेण्यासाठी बुकिंग करावं लागतं. थोडक्यात सांगायचं, तर दु:खात बुडालेल्या लोकांसाठी निशीमोटो मोठा आधार ठरत चालले आहेत.

Web Title: daukha-tao-apanaa-saathai-haai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.