दाऊदच्या हस्तकास बांगलादेशात अटक
By admin | Published: December 4, 2014 01:03 AM2014-12-04T01:03:34+5:302014-12-04T01:03:34+5:30
अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम याच्या जवळच्या साथीदाराला बांगलादेशात अटक झाली असून, पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे.
ढाका : अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम याच्या जवळच्या साथीदाराला बांगलादेशात अटक झाली असून, पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे. त्याच्या दहशतवादी संघटनांशी असलेल्या संबंधाबद्दल चौकशी करण्यात येत आहे. अब्दुल रौफ उर्फ दाऊद मर्चंट असे याचे नाव असून, त्याच्यावर १९९७ साली संगीतकार गुलशनकुमार याची हत्या केल्याचा आरोप आहे.
येथील न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. मे २००९ मध्ये बांगलादेशात बेकायदेशीर प्रवेश केल्याच्या आरोपावरुन मर्चंट (४४) याला अटक करण्यात आली होती. पाच वर्षाची शिक्षा भोगून झाल्यानंतर आता त्याला पुन्हा अटक करण्यात आली आहे. न्यायदंडाधिकारी नुरु मिया यांनी त्याला तीन दिवसांच्या रीमांडवर पाठविले आहे. त्याची चौकशी करण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)