लिबियाच्या किनाऱ्यावर ४० निर्वासितांचे मृतदेह

By admin | Published: October 25, 2015 11:39 PM2015-10-25T23:39:01+5:302015-10-25T23:39:01+5:30

लिबियाची राजधानी त्रिपोलीच्या समुद्र किनाऱ्यावर निर्वासितांचे ४० मृतदेह शनिवारी आढळले. पूर्वेकडील झ्लिटेन गावात त्यातील २७ व राहिलेले मृतदेह जवळच्या खोम्स

Dead bodies of 40 refugees on the Libyan coast | लिबियाच्या किनाऱ्यावर ४० निर्वासितांचे मृतदेह

लिबियाच्या किनाऱ्यावर ४० निर्वासितांचे मृतदेह

Next

त्रिपोली : लिबियाची राजधानी त्रिपोलीच्या समुद्र किनाऱ्यावर निर्वासितांचे ४० मृतदेह शनिवारी आढळले. पूर्वेकडील झ्लिटेन गावात त्यातील २७ व राहिलेले मृतदेह जवळच्या खोम्स गावात वाहून आल्याचे लिबियाच्या रेड क्रेसेंटच्या प्रवक्त्याने सांगितले.
युरोपमध्ये आश्रय मिळविण्याच्या प्रयत्नांत अनेक निर्वासित अजूनही स्वत:चा जीव धोक्यात घालत आहेत. लिबियातून युरोपियन देशांत आश्रय मिळविण्याचा प्रयत्न करणारे बहुतेक निर्वासित हे सहारा आफ्रिकन देशांतील आहेत.
बचाव पथक आणखी ३० निर्वासितांचा शोध घेत आहे. हे निर्वासित ज्या बोटीतून प्रवास करीत होते ती उलटली होती.
या महिन्याच्या सुरुवातीला मेडिटेरियन समुद्रात १०० निर्वासित बुडाले होते व त्यांचे मृतदेह लिबियातील किनाऱ्यावर वाहत आले होते.
स्थलांतरितांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेने म्हटले आहे की, युरोपच्या किनाऱ्यांवर यावर्षी जानेवारीपासून ६ लाखांपेक्षा जास्त निर्वासित आले असून युरोपला पोहोचण्याच्या प्रयत्नांत त्यातील ३ हजार एक तर मरण पावले असावेत किंवा बेपत्ता झाले असावेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Dead bodies of 40 refugees on the Libyan coast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.