भय इथले संपत नाही! कोरोनानंतर अमेरिकेत खतरनाक फंगसचा अटॅक; वेगाने पसरतोय संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 05:59 PM2023-03-21T17:59:22+5:302023-03-21T18:15:41+5:30

रहस्यमय आणि खतरनाक फंगल इन्फेक्शन संपूर्ण अमेरिकेत वेगाने पसरत आहे.

deadly candida auris fungus mysteriously spreading in america after corona | भय इथले संपत नाही! कोरोनानंतर अमेरिकेत खतरनाक फंगसचा अटॅक; वेगाने पसरतोय संसर्ग

भय इथले संपत नाही! कोरोनानंतर अमेरिकेत खतरनाक फंगसचा अटॅक; वेगाने पसरतोय संसर्ग

googlenewsNext

Candida Auris नावाचं एक रहस्यमय आणि खतरनाक फंगल इन्फेक्शन संपूर्ण अमेरिकेत वेगाने पसरत आहे. फंगसचं निरीक्षण करणाऱ्या यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) ने ही माहिती दिली आहे. गेल्या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेने 19 फंगल पॅथौगनच्या लिस्टमध्ये सी ऑरिसला प्रायोरिटी दिली होती. मल्टीड्रग-रेजिस्टेंस फंगस (Yeast) 15 वर्षांपूर्वी जपानमध्ये सर्वप्रथम आढळला. वॉल स्ट्रीट जर्नलच्या मते, 2022 मध्ये अमेरिकेत 2377 लोकांना संसर्ग झाला आहे.

एनल्स ऑफ इंटर्नल मेडिसिनमध्ये प्रकाशित सीडीसीचा नवा रिसर्च असे दर्शवितो की 2021 मध्ये, 2019 आणि 2021 च्या तुलनेत देशातील आरोग्य केंद्रांमध्ये या फंगल इन्फेक्शनची 95 टक्के अधिक प्रकरणे आढळून आली. तर 2016 मध्ये या फंगलने अमेरिकेत केवळ 53 लोकांना संसर्ग केला होता.

कोलंबियामध्येही संसर्ग झाला

अमेरिकेसोबतच हा जीवघेणा संसर्ग कोलंबियामध्येही दाखल झाला आहे. एकूण 28 राज्ये आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया यांनी संसर्गाची पुष्टी केली आहे. यासोबतच, सध्याची परिस्थिती पाहता, असे मानले जाते की या फंगलशी लढण्यासाठी सर्व सुरक्षा उपाय पुरेसे नाहीत.

WHO ने दिला इशारा 

डब्ल्यूएचओ आणि सीडीसी या दोघांनी ही फंगस सार्वजनिक आरोग्यासाठी वाढता धोका असल्याचं म्हटलं आहे. कारण त्याचा मृत्यू दर 60 टक्क्यांपर्यंत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की जे लोक वृद्ध आहेत किंवा ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत आहे त्यांना अधिक संसर्ग होऊ शकतो, विशेषत: फंगसच्या संपर्कात आल्यानंतर या फंगसमुळे जखमा आणि कानात संक्रमण होते. या फंगसमुळे रुग्णांमध्ये गंभीर आजार तर होतातच पण योग्य चाचण्यांशिवाय ओळखणेही अवघड असते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: deadly candida auris fungus mysteriously spreading in america after corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.