म्यानमारमधून पलायन करताना बोट उलटून 12 रोहिंग्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2017 05:04 PM2017-10-09T17:04:58+5:302017-10-09T17:31:47+5:30

बांगलादेशमध्ये फिशिंग ट्रॉलरमध्ये बसून पळून जाणाऱ्या रोहिंग्यांची बोट बुडून 12 रोहिंग्यांचा मृत्यू झाला आहे. हे रोहिंग्या म्यानमारमधील अशांततेस आणि अराजकतेस कंटाळून दोन्ही देशांच्यामध्ये असणाऱ्या नेफ नदीतून पळून जात होते. तसेच या बोटीमधील 13 लोकांना वाचवण्यात यश आल्याचे बांगलादेशातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

The death of 12 Rohingya was over when boat fired from Myanmar | म्यानमारमधून पलायन करताना बोट उलटून 12 रोहिंग्यांचा मृत्यू

म्यानमारमधून पलायन करताना बोट उलटून 12 रोहिंग्यांचा मृत्यू

Next
ठळक मुद्देनेफ नदी ओलांडून बांगलादेशात जाताना रोहिंग्यांच्या बोटींनी आजवर अनेकदा अपघात झाले आहेत.बांगलादेश आणि म्यानमार यांच्यामध्ये नेफ ही नैसर्गिक सीमा आहे.

कॉक्स बझार, दि.9-  बांगलादेशमध्ये फिशिंग ट्रॉलरमध्ये बसून पळून जाणाऱ्या रोहिंग्यांची बोट बुडून 12 रोहिंग्यांचा मृत्यू झाला आहे. हे रोहिंग्या म्यानमारमधील अशांततेस आणि अराजकतेस कंटाळून दोन्ही देशांच्यामध्ये असणाऱ्या नेफ नदीतून पळून जात होते. तसेच या बोटीमधील 13 लोकांना वाचवण्यात यश आल्याचे बांगलादेशातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

रोहिंग्यांची घुसखोरी रोखण्यासाठी बीएसएफने 50 संवेदनशील ठिकाणी वाढवली गस्त, आसाममध्ये हायअलर्ट 

बांगलादेश बॉर्डर गार्डसच्या सैनिकाने सांगितल्याप्रमाणे, हे लोक अत्यंत घाबरलेले होते, त्यांना वाचवल्यावर प्रथमोपचार करण्यात आले. अन्न आणि औषधाची मदत केल्यानंतर यांना कॅम्पमध्ये ठेवण्यात आले आहे. बुडालेल्या 12 व्यक्तींचे मृतदेह बांगलादेशच्या दक्षिणेस असणाऱ्या शाह पारीर द्वीप येथे वाहून आले आहेत.


आंग सान यांची भूमिका धक्कादायक

बांगलादेशच्या स्टेट कौन्सिलर आंग सान सू की यांनी रोहिंग्यांबाबत अजूनही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. रोहिंग्या का पळून जात आहेत ते माहिती नाही असं धक्कादायक विधान त्यांनी केलं आहे. राखिन प्रांतात शांततेसाठी आमचे सरकार आधीपासून प्रयत्न करत आहे. २०१७-२२ अशी राखिनसाठी पंचवार्षिक योजनाही आम्ही केली आहे. त्यामुळे येथे रोजगार उपलब्ध होईल, शिक्षण आरोग्याच्या सुविधा वाढल्या आहेत. तसेच जेथे फक्त बोटीने जाता येत असे अशा प्रदेशातही रस्ते, वीज व पायाभूत सुविधांची सोय माझ्या सरकारने केल्या आहेत. राखिन प्रांतामध्ये नवे रेडिओ स्टेशन सुरु होणार असून त्यात बंगाली, राखिन व म्यानमारी भाषेत आरोग्य व शिक्षणाचे महत्त्व पटवून दिलं जाईल. रोहिंग्यांच्या देशाबाहेर जाण्याबाबत  सू की  म्हणाल्या, रोहिंग्यांनी बांगलादेशात जाण्याचे काहीच कारण नाही, ५ सप्टेंबर नंतर कोणतीही हिंसा किंवा लष्करी कारवाई राखिनमध्ये झालेली नाही. तसेच ५०% मुस्लीम गावे आजही तशीच व्यवस्थित आहेत, त्यामुळे त्यांच्या स्थलांतरामागची कारणे जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. बांगलादेशाशी संबंध सुधारण्याचे आमचे सरकार प्रयत्न करत आहे.

रोहिंग्यांना सहानुभूती दाखवणे ही देशद्रोहाची शेवटची सीमाच - उद्धव ठाकरे

Web Title: The death of 12 Rohingya was over when boat fired from Myanmar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.