पंधरा वर्षीय मॉडेलचा कामाच्या अतिताणामुळे मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 06:13 PM2017-10-31T18:13:40+5:302017-10-31T18:29:59+5:30
चीन - जर तुम्हीही क्षमतेपेक्षा अधिक काम करत असाल तर सावधान. कारण अतिरिक्त ताणात काम केल्यामुळे एका तरुणीला आपला जीव गमवावा लागला आहे. एका १४ वर्षीय रशियन मॉडेलचा अतिकाम केल्याने ह्रुदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
व्यादा डि’झ्युबा असे या तरुण मॉडेलचं नाव आहे. ती चीनमध्ये इएसइइ या मॉडेलिंग एजन्सीमध्ये काम करत होती. तिच्या मृत्यूनंतर तिच्या आईने या मॉडेलचा एक फोटो नुकताच सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये तिचा मोठा भाऊ आणि बहिणीच्या लहान मुलासोबत ती दिसते. सोशल मीडियावरील या फोटोवर अनेकांनी हळहळही व्यक्त केली आहे. ती दिवसाला ६.३० युएस डॉलर एवढे दिवसाला कमवित होती. यासाठी ती दिवसातून तब्बल १३ तास काम करायची. दिवसातून १३ तास काम केल्याने तिच्यावर ताण आला आणि त्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या पालकांकडून केला जात आहे.
एका असायन्मेंटकरता ती आपल्या आईशिवाय चीनमध्ये राहत होती. तिचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा ती फार थकलेली होती आणि त्यामुळे तिचा मेंदूही कार्यन्वित नव्हता असा अहवाल स्थानिक माध्यमांतून देण्यात आलाय. पुढच्या दोनच आठवड्यात तिचा पंधरावा वाढदिवस साजरा करण्यात येणार होता. मात्र त्याआधीच तिने जगातून निरोप घेतला आहे. रशियन इनव्हेस्टिगेशन टीमकडून तिच्या मृत्यूच्या कारणाबाबत अधिक तपास सुरू आहे. त्याचप्रमाणे याप्रकरणी वेगळाच प्रश्नच निर्माण केला आहे. लहान वयात एवढ्या आपल्या मुलीला पाठवण्यामागे पालकांचा काय उद्देश असेल? त्याचप्रमाणे एखादी कंपनी लहान मुलांना १३ तासांची ड्युटी लावूच कशी शकतात? त्यामुळे हा मृत्यू बालमजुरीच्या मृत्यूपैकीच एक मानला पाहिजे, असंही काहींनी म्हटलं आहे. व्यादाची आई ओकसाना म्हणते की, तिला ह्रदयविकाराचा झटका येण्याआधी तिने मला फोन केला होता. ‘मी खूप थकले आहे, मला खूप झोपेची गरज आहे,’ असं तिनं सांगितलं. आणि त्यानंतर काहीच वेळात तिचा मृत्यू झाला.
इएसइइचे संस्थापक झेंग ई सांगतात की, ‘आम्ही कोणत्याही प्रकारे बालमजुरी करून घेत नाहीत. शिवाय तिनेही कधीच कामाचा अतिरिक्त ताण असल्याची तक्रार आमच्याकडे केली नव्हती. ती अतिशय सालस आणि हुशार मुलगी होती. तिच्यासोबत आम्ही दोन वर्ष काम केलंय. त्यामुळे ती गेल्याने कधीच भरून न निघारी पोकळी निर्माण झाली आहे.’ इएसइइचे जनसंपर्क अधिकारी मिशेल चेन यांनी सांगितलं की, ‘इतर देशांप्रमाणे चीनमध्ये बालकामगारांबाबत कोणताच नियम नाहीए. त्यामुळे आम्ही कंपनीत लहान मुलांना कामावर ठेवू शकतो.’
सौजन्य - www.mirror.co.uk