प्रदूषणामुळे दरवर्षी १७ लाख बालकांचा मृत्यू

By admin | Published: March 7, 2017 03:54 AM2017-03-07T03:54:28+5:302017-03-07T03:54:28+5:30

प्रदूषणामुळे दरवर्षी पाच वर्षांखालील १७ लाख बालकांचा मृत्यू होतो

The death of 17 lakh children annually due to pollution | प्रदूषणामुळे दरवर्षी १७ लाख बालकांचा मृत्यू

प्रदूषणामुळे दरवर्षी १७ लाख बालकांचा मृत्यू

Next


जीनिव्हा : प्रदूषणामुळे दरवर्षी पाच वर्षांखालील १७ लाख बालकांचा मृत्यू होतो, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या अहवालात म्हटले आहे. हा अहवाल सोमवारी प्रकाशित झाला. घर आणि बाहेरील प्रदूषित हवा, अप्रत्यक्ष धूम्रपान, असुरक्षित पाणी, स्वच्छतेचा अभाव यामुळे दरवर्षी १७ लाख बालके प्राण गमावतात, असे या अहवालात म्हटले आहे.
>काय म्हणतो अहवाल?
एक महिना ते पाच वर्षांदरम्यानच्या बहुतांश बालकांचे मृत्यू मलेरिया, न्यूमोनिया आणि डायरियामुळे होतात. सुरक्षित पाणी आणि स्वयंपाकाच्या स्वच्छ इंधनाचा वापर करून हे आजार टाळता येऊ शकतात, असे या अहवालात म्हटले आहे.
>बालकांचा जीव घेणारे...
प्रदूषणामुळे मुदतपूर्व प्रसूतीचाही धोका असतो. घर आणि बाहेरील प्रदूषणाशी संपर्क, तसेच अप्रत्यक्ष धूम्रपान यामुळे बालकांना बालपणी न्यूमोनिया होऊ शकतो, तसेच पुढे चालून त्यांना दम्यासारखा श्वसनविकार जडण्याचीही शक्यता असते. प्रदूषित हवेच्या श्वसनामुळे त्यांना हृदयरोग, मस्तिष्काघात आणि कर्करोग होण्याचा जीवनभर धोका असतो.
5.70 लाख बालकांचा न्यूमोनिया यासारख्या श्वसनप्रणालीच्या संसर्गामुळे मृत्यू होतो. प्रदूषित हवा, तसेच धूम्रपान करणाऱ्यांचा संपर्क यामुळे हे होते.
2.70 लाख बालकांचा मुदतपूर्व प्रसूती, प्रदूषणांमुळे होणारे संसर्ग यामुळे मृत्यू होतो. आरोग्य केंद्रांत स्वच्छ पाणी, स्वच्छता, प्रदूषण कमी करण्याने हे मृत्यू टाळू शकतो.
02 लाख मुलांचा दरवर्षी मलेरियामुळे मृत्यू होतो. डासांची उत्पत्तीस्थाने कमी करून तद्वतच पिण्याचे पाणी झाकून ठेवून आपण हे मृत्यू टाळू शकतो.
02 लाख मुले उंचावरून पडून, विषबाधा होऊन किंवा पाण्यात बुडून दरवर्षी मृत्युमुखी पडतात.
>प्रदूषित पर्यावरण वाढत्या वयातील मुलांसाठी अधिक घातक आहे. विकसित होत असलेले अवयव आणि रोगप्रतिकारक प्रणाली, तसेच छोटा श्वसनमार्ग यामुळे मुलांना प्रदूषित हवा आणि पाण्याची पटकन बाधा होते.
- मार्गारेट चॅन, महासंचालक, जागतिक आरोग्य संघटना
प्रदूषित पर्यावरणाचा आमच्या मुलांच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहे.
- डॉ. मारिया नैरा, संचालक, जागतिक आरोग्य संघटना

Web Title: The death of 17 lakh children annually due to pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.