Corona Virus : इटलीतील मृतांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या अधिक, हे आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 01:41 PM2020-03-21T13:41:55+5:302020-03-21T13:48:27+5:30
इटलीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा आता चार हजारच्याही पुढे गेला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे येथे मृतांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या अधिक आहे.
रोम : जगभरातच कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस जगभरातील मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. या व्हायरचा इटलीला सर्वाधिक फटका बसला आहे. मृतांच्या आकडेवारीच्या बाबतीत इटलीनेचीनलाही मागे सोडले आहे. ताज्या आकडेवारीनुसार इटलीत एका दिवसात तब्बल 627 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 5986 नवे रुग्ण समोर आले आहेत.
इटलीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा आता चार हजारच्याही पुढे गेला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे येथे मृतांमध्ये महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या अधिक आहे.
काही तज्ज्ञ मंडळींच्या म्हणण्याप्रमाणे, महिलांच्या तुलनेत पुरुषांना कोरोना होण्याची शक्यता, जेवढी वृद्धांना असते तेवढीच असते. काही दिवसांपूर्वी जवळपास अशीच अकडेवारी चीनमध्येही दिसून आली होते. येथेही कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक होते.
रोममधील एका संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, 25,058 कोरोनाग्रस्तांमध्ये 5 टक्के महिलां रुग्णांच्या तुलनेत 8 टक्के पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जॉन्स हॉपकिन्स यूनिव्हर्सिटीच्या प्राध्यापक साबरा क्लेन यांनी म्हटले आहे, की महिलांच्या तुलनेत पुरुषांना कोरोनाची लागण होणाऱ्या शक्यता जेवढी वृद्धांना असते तेवढीच असते. लोकांमध्ये हा फरक जैविक अथवा व्यवहारिक असू शकतो. एका अभ्यासानुसार पुरुषांच्या तुलनेत महिलांची रोगप्रतिकारक शक्ती अधिक असते. तसेच पुरुषांमध्ये अधिक धुम्रपान आणि हात धुन्याची सवय कमी, हे आहे.
कोरोना व्हायरससंदर्भात बोलताना अमेरिकेतील डॉक्टर डेबोरा बीरक्स म्हणाले, इटलीमध्ये मरणारांची संख्या महिलांच्या तुलनेत दुप्पट आहे. विशेषतः येथे 50 हून अधिक वय असलेले पुरुष अधिक संक्रमित आहेत. महिलांमध्ये असणारा सेक्स हार्मोन एस्ट्रोजनदेखील रोगप्रतिकार शक्तीला मदत करतो. X क्रोमोसोमलाही इम्यूनिटी जीन मानले जाते. जो महिलांमध्ये दोन तर पुरुषांमध्ये केवळ एकच असतो.
यापूर्वीही काही हेल्थ एक्सपर्ट्सनी इशारा दिला होता, की धुम्रपान अथवा ई-सिगरेट कोरोना व्हायरसचे संक्रमण अधिक धोकादाय बनवू शकतो.
चीनमधील एका मेडिकल जर्नलमध्ये आलेल्या एका लेखात म्हणण्यात आले आहे, की 78 कोरोनाग्रस्त धुम्रपानकरत होते. यासर्वांना निमोनिया झाला होता.
चॅपल हिल येथील बायोलॉजीचे प्राध्यापक रॉबर्ट यांनी म्हटले आहे, की 'धूम्रपानामुळे इन्फ्लूएंझाचा धोका अधिक वाढतो. जे लोक धुम्रपान करतात त्यांची रोग प्रतिकारक शक्ती काही प्रमाणात कमी होते. त्यांचे फुफूसदेखील चांगले नसते. जे लोक अधिक धुम्रपान करतात, त्यांना कोरोनाची लागण होण्याची अधिक भीती आहे. हा व्हायरस एकदाका शरिरात गेता तर त्याचे अनेक गंभीर परिणाम होतात.
कोरोना व्हायरसने जगभरात रौद्र रुप धारण केले असून १७९ देशांना विळखा घातला आहे. आतापर्यंत 10049 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अडीज लाखांच्या आसपास रुग्ण आढळले आहेत. दरम्यान, इटलीमध्ये कोरोना विषाणूने आता चीनपेक्षा भयानक रूप धारण केले आहे. कोरोना विषाणूमुळे इटलीमध्ये दररोज शेकडो लोकांचा मृत्यू होत आहे. दोन दिवसांपूर्वीच इटलीमध्ये एका दिवसात 475 लोकांचा मृत्यू झाला होता. तर आज इटलीमध्ये दिवसभरात 627 जणांचा मृत्यू झाला आहे. आता इटलीमध्ये सुमारे चार हजार जणांचा कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.