चीनमधील ‘माउंट हुशान’ या भागात मृत्यूचा रस्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 04:34 AM2017-12-29T04:34:30+5:302017-12-29T04:34:42+5:30
मृत्यूची टांगती तलवार म्हणजे काय? याचा अनुभव घ्यायचा असेल तर, लोक चीनमधील ‘माउंट हुशान’ या भागात जातात.
बीजिंग- मृत्यूची टांगती तलवार म्हणजे काय? याचा अनुभव घ्यायचा असेल तर, लोक चीनमधील ‘माउंट हुशान’ या भागात जातात. उंच डोंगरांच्या अगदी भिंतीसारख्या भागावर लाकडी प्लेट्स लावून येथून जाण्याचा मार्ग तयार करण्यात आला आहे. येथून जाताना झालेली थोडीशी चूक त्या व्यक्तीला मृत्यूच्या खाईत ढकलू शकते. अगदी असंही म्हणतात की, येथे येणारे लोक मृत्यू जवळून पाहण्यासाठीच येतात. खूप हिंमतवान लोकच या भागात येतात आणि या भागातून चालण्याचे धाडस करतात. जमिनीपासून ७०८७ फूट उंचीवर केवळ एका लाकडी फळीवरून चालणे सोपी गोष्ट नाही. चीनच्या दक्षिण
भागात असणारा हा पर्वत पर्यटकांचे खास आकर्षण आहे. असे सांगतात की, पूर्वी या भागात मंदिर होते. त्यामुळे पुजारी आणि संन्यासी येथे येत असत. आपल्या सुविधेसाठी त्यांनी या शिड्या बनविल्या.असे सांगतात की, या भागात दरवर्षी १०० जणांचा मृत्यू होतो.