टोकियोत ग्लायडर घरावर कोसळून दोघांचा मृत्यू

By admin | Published: March 17, 2016 03:40 PM2016-03-17T15:40:42+5:302016-03-17T15:44:37+5:30

रहिवाशी परिसरात ग्लायडर कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. नरीटा विमानतळाच्या बाजूला असणा-या लोकवस्तीत हे ग्लायडर कोसळले

Death of two people collapsed in Tokyo Glyder house | टोकियोत ग्लायडर घरावर कोसळून दोघांचा मृत्यू

टोकियोत ग्लायडर घरावर कोसळून दोघांचा मृत्यू

Next
>
ऑनलाइन लोकमत -
टोकियो, दि. १७ - ग्लायडरचा अपघात झाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातग्रस्त ग्लायजर रहिवाशी परिसरातच कोसळले. नरीटा विमानतळाच्या बाजूला असणा-या लोकवस्तीत हे ग्लायडर कोसळले. ग्लायडर घरांवर कोसळल्याने घरांचे नुकसान झाले आहे. सोबतच ग्लायडरसोबत प्रवास करणा-या दोघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
 
ग्लायडरचा एक भाग तुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अपघातामुळे ग्लायडरचे तुकडे झाले आणि घरांच्या छतावरच कोसळले. 69 वर्षीय शुजी यांच्यासोबत एकजण या अपघातात जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला. नेमका अपघात कसा झाला याचा तपास सुरु आहे. 

Web Title: Death of two people collapsed in Tokyo Glyder house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.